-
१४ फेब्रुवारी हा दिवस जगभरात ‘व्हॅलेंटाईन डे’ म्हणून साजरा करण्यात येतो.
-
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही व्हॅलेंटाईन डे मोठ्या उत्साहाने आणि प्रेमाने साजरा केला गेला.
-
तरुणांपासून ते अगदी प्रौढांपर्यंत सगळ्यांनीच आपल्या जिवलगांसोबत व्हॅलेंटाईन डे साजरा केला.
-
प्रेमी युगुलांमुळे सोमवारी वातावरण अगदी प्रेममय झालं होतं.
-
व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यात पुणेकर देखील मागे राहिले नाहीत.
-
पुण्यात ‘व्हॅलेंटाईन डे’साठी खास लाल फुग्यांनी आकर्षक सजावट करण्यात आली होती.
-
व्हॅलेंटाईन डे साजरा करताना पुणेकर.
-
व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने पुणेकरांना गाण्यावर थिरकण्याचा मोह देखील आवरता आला नाही.
-
पुण्यातील छत्रपती संभाजी महाराज गार्डन जवळ ग्रुप डान्सच्या माध्यमातून महिला शक्ती आणि महिलांच्या सुरक्षिततेबद्दल जनजागृती करण्यात आली.
-
अभिव्यक्ती, वारसा सोशल फाऊंडेशन आणि सखी सहेली महिला मंडळ यांच्यातर्फे करण्यात आलेल्या या डान्समध्ये पुणेकरांनीही सहभाग घेतला.
-
पुणेकरांच्या व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेशनमध्ये चंद्र होता साक्षीला.
-
पुणेकरांचा व्हॅलेंटाईन डे स्पेशल करण्यासाठी हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्समध्ये खास थीमने सजावट करण्यात आली होती.
-
व्हॅलेंटाईन डे साजरा करतानाचा पुणेकरांचा उत्साह बघण्यासारखा होता.
-
पुण्यात देखील सोमवारी प्रेमाचे वारे वाहिले.
-
(सर्व फोटो : अरुल होरायझन, आशिष काळे, इंडियन एक्सप्रेस)

२७ फेब्रुवारी पंचांग: दर्श अमावस्येला कर्क, मीन राशीला होईल ‘या’ रूपात लाभ; तुमच्या आयुष्यात आज काय घडणार? वाचा राशिभविष्य