-
पुढच्या काही दिवसात भाजपाचे साडेतीन लोक अनिल देशमुखांच्याच कोठडीत असतील आणि अनिल देशमुख बाहेर असतील, असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपाला आव्हान दिलं आहे.
-
भाजपाने केलेल्या आरोपांना आज शिवसेना भवन इथं पत्रकार परिषद घेत संजय राऊत उत्तर देणार आहेत. याच पत्रकार परिषदेत ते कोणते नवे खुलासे करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. (फोटो सौजन्य – संजय राऊत ट्वीटर)
-
या पत्रकार परिषदेनिमित्त मुंबईतल्या शिवसेना भवनाबाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे.
-
त्यासोबतच शिवसेनाही या पत्रकार परिषदेसाठी जोरदार तयारी करत आहे.
-
मुंबईत शिवसेनेकडून जोरदार पोस्टरबाजी करत शक्तीप्रदर्शन करण्यात येत आहे.
-
‘पुष्पा’ चित्रपटातल्या झुकेगा नही या डायलॉगच्या संदर्भाने ‘झुकेंगे नही’ असं लिहिलेलं आहे.
-
ही पत्रकार परिषद लाईव्ह पाहता यावी यासाठी शिवसेना भवनाबाहेर एलईडी स्क्रीनही लावण्यात आलं आहे.
-
या पत्रकार परिषदेसाठी शिवसेनेचे पदाधिकारी, आमदार, खासदारांना उपस्थित राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
-
त्यामुळे शिवसेना भवनाच्या परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आज दुपारी चार वाजता ही पत्रकार परिषद होणार आहे.

‘उनसे मिली नजर’, गाण्यावर विद्यार्थिनींचा शिक्षकाबरोबर जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कमेंट्स