-
देशातील सर्वात लांब भुयारी रेल्वे मार्गाच्या बांधकामातील महत्त्वाचा टप्पा यशस्वीपणे पार पडला आहे.
-
टी ४९ या भुयारी मार्गाचा कत्रा-बनिहालचा भाग मुख्य भुयाराशी यशस्वीपणे जोडण्यात आला आहे. नॉर्थर्न रेल्वेने याबाबत माहिती दिली आहे.
-
उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे प्रकल्पाचं काम पूर्ण झाल्यानंतर हा देशातील सर्वात लांब भुयारी रेल्वे मार्ग ठरणार आहे.
-
उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे प्रकल्पातील हा भुयारी मार्ग १२.७५ किलोमीटर इतक्या लांबीचा आहे.
-
टी-४९ भुयारी मार्गावर दोन भुयार आहेत. यात एक मुख्य रेल्वे मार्गाचं भुयार आहे, तर दुसरं आपत्कालिन स्थितीत बचावासाठी वापरता यावं यासाठीचं समांतर भुयार आहे.
-
आंतरराष्ट्रीय मानकांप्रमाणे बचाव भुयार मुख्य भुयाराच्या समांतरच तयार करण्यात आलं आहे.
-
उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे प्रकल्प २७२ किलोमीटरचा आहे. त्यापैकी १६१ किलोमीटरच्या मार्गाचं काम झालं असून तो सुरूही झालाय. उर्वरित १११ किलोमीटर भुयारी मार्गाचं काम प्रगतीपथावर आहे. (सर्व फोटो सौजन्य : भारतीय रेल्वे मंत्रालय ट्विटर)
‘त्याला पाहून ती ढसाढसा रडली…’ तिच्या हळदीचा भावनिक क्षण; काळजाला भिडणारा VIDEO एकदा पाहाच