-
१९ फेब्रुवारी हा दिवस छत्रपती शिवाजी महाराज जयंती म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला जातो.
-
१९ फेब्रुवारी १६३० रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची सोनेरी पावले या पृथ्वीतलावर पडली.
-
म्हणूनच दरवर्षी १९ फेब्रुवारीला शिवजयंती साजरी केली जाते.
-
करोनाच्या संकटामुळे मागील दोन वर्ष अगदी साध्या पद्धतीने शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला.
-
शिवजयंती उत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना शिवप्रेमींमध्ये लगबग पाहायला मिळत आहे.
-
कलाकारांकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तींवर रंगरंगोटी करण्याचं काम सुरु आहे.
-
पुण्यातील सिंहगड रोड येथील एका वर्कशॉपमध्ये टिपलेले हे दृश्य.
-
शिवरायांच्या मूर्तीला सजवण्यात मग्न असलेले मूर्तीकार.
-
(सर्व फोटो : आशिष काळे/ इंडियन एक्सप्रेस)

३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख