-
शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने लालमहाल येथे शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.
-
जय शिवाजी जय भवानीचा शिवभक्तांनी केलेला मर्दानी जयघोष,पारंपरिक युध्दकलेचा थरार, रणशिंगाची ललकारी पाहायला मिळाली.
-
तर, पारंपरिक पोशाखात महिला, लहान मुले उपस्थित होती.
-
हा सोहळा उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला.
-
या सोहळ्याची सुरुवात पारंपरिक पोशाख परिधान केलेल्या महिला भगिनींच्या हस्ते शिवरायांना औक्षण करुन झाली.
-
समितीच्या महिलांनी शिवजन्म पाळणा सादर केला.
-
विश्व शिवकालीन मर्दानी युध्दकला महासंघाचे सदस्य असलेल्या प्राध्यापक राजेश पवार यांच्या शिवसंस्कार युध्दकला संघाने चित्तथरारक शस्त्र कला सादर केली.
-
तर खास महाबळेश्वरवरुन आलेल्या रणशिंग पथकाने रणशिंगाची मानवंदना दिली.
-
‘जय भवानी जय शिवाजी,छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो….’, या घोषणांनी आज लाल महालाचा परिसरात दुमदुमून गेला. (सर्व फोटो – लोकसत्ता)

२३ फेब्रुवारी पंचांग: मेष, कन्या राशीचा रविवार जाणार आनंदात; तुमच्या नशिबात कोणत्या मार्गे येणार सुख? वाचा राशिभविष्य