-
रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. पण बलाढ्य रशियासमोर झुकणे युक्रेनला मान्य नाही.
-
राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की अजूनही माघार घ्यायला तयार नसून रशियाशी खंबीरपणे लढणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
-
तसेच राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी देश सोडण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे.
-
रशियन फौजा युक्रेनची राजधानी कीवमध्ये धडकल्या असताना युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी अमेरिकेनं देऊ केलेली मदत नाकारली आहे. कारण ही मदत युद्ध लढण्यासाठी नसून त्यांना देशाबाहेर निघण्यासाठीची होती!
-
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यामध्ये शुक्रवारी मदतीसंदर्भात सविस्तर चर्चा झाली.
-
एपी न्यूजनं दिलेल्या वृत्तानुसार, या चर्चेदरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी वोलोडिमिर झेलेन्स्की यांना युक्रेनमधून सुरक्षित बाहेर काढण्याचा ‘एक्झिट प्लान’ दिला.
-
मात्र, यावेळी वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी रशियन फौजांचा प्रतिकार करण्याचा निर्धार व्यक्त करत आप कीवध्येच राहणार असल्याचं स्पष्टपणे सांगत अमेरिकेची मदत नाकारली आहे.
-
दरम्यान, शनिवारी तिसऱ्या दिवशी युक्रेनमध्ये रशियन हल्ले सुरूच आहे.
-
राजधानी किव्हसह इतर काही शहरांमध्ये बॉम्बस्फोट सुरू आहेत.
-
लोक छावण्यांमध्ये आश्रय घेऊ लागले आहेत.
-
तर अनेक जण जीव वाचवण्यासाठी पलायन करत आहे.
-
युक्रेनमधील परिस्थिती सध्या गंभीर होत चालली आहे.
-
अनेक ठिकाणी हल्ल्यांमध्ये लोक मृत्यूमुखी पडले आहेत.
-
तर काही ठिकाणी हल्ल्यामुळे लोकांचा आरडाओरडा दिसून आला.
-
हवाई हल्ल्यांमुळे अनेक ठिकाणी घरं आणि इमारतींची पडझड झाली आहे. अनेकांनी घाबरून पळ काढला, तर अनेकांना या तणावाच्या परिस्थितीत सुरक्षित राहण्यासाठी बंकरमध्ये जावे लागले.
-
रशियन सैन्याने देशाच्या दक्षिणेकडे लक्ष केंद्रित केले होते, जेथे क्रिमियाच्या उत्तरेकडील खेरसन आणि मायकोलेव्ह, ओडेसा आणि मारियुपोल या काळ्या समुद्रातील बंदर शहरांमध्ये भीषण लढाई सुरू आहे.
-
या फोटोंमधून युक्रेनमधील सध्याची परिस्थिती किती गंभीर आहे हे दिसून येते.
-
सर्व फोटो – AP वरून साभार

२३ फेब्रुवारी पंचांग: मेष, कन्या राशीचा रविवार जाणार आनंदात; तुमच्या नशिबात कोणत्या मार्गे येणार सुख? वाचा राशिभविष्य