-
देशभरात आज (दि.१ मार्च) महाशिवरात्री मोठ्या उत्साहाने साजरी केली जात आहे.
-
माघ कृष्ण चतुर्दशी ही तिथी ‘महाशिवरात्री’ म्हणून ओळखली जाते.
-
देवांचे देव आणि तिन्ही लोकांचे स्वामी महादेवांचा हा सर्वात मोठा उत्सव असतो.
-
महाशिवरात्रीनिमित्त मंदिरांना आकर्षक विद्युत रोषणाई आणि फुलांची सजावट करण्यात आलेली आहे.
-
भाविकांकडून शिवमंदिरात शिवलिंगावर बेलपत्र आणि दूध-पाण्याचा अभिषेक केला जातो.
-
मध्य प्रदेशातील उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरात भगवान शंकराची पूजा केली गेली.
-
वाळू शिल्पकार सुदर्शन पटनायक यांनी पुरी ओडिशा येथील समुद्रकिनाऱ्यावर भगवान शिवाची आकर्षक मूर्ती तयार केली आहे.
-
यासाठी त्यांनी २३ हजारांहून अधिक रुद्राक्षांचा वापर केला आहे.
-
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गोरखनाथ मंदिरात अभिषेक केला.
-
महाशिवरात्रीनिमित्त जम्मू काश्मीरमधील रेसी जिल्ह्यातील महादेव मंदिरात भाविकांनी दर्शन घेतलं.
-
पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणी मंदिरात महाशिवरात्री निमित्त बेलाच्या पानांची आरास.
-
उत्तराखंड येथील प्रसिद्ध बद्रीनाथ मंदिराबाहेर इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलीस (ITBP) जवानांनी साजरी केली महाशिवरात्री.
-
(सर्व फोटो सौजन्य : ANI)

महामार्ग वाहतूक कोंडीमुक्तीच्या दिशेने पहिले पाऊल; संयुक्त कारवाईमध्ये महामार्गालगतची २०१ अतिक्रमणे हटविली