-
दरवर्षी महाशिवरात्रीचा उत्सव देशभरात मोठ्या आनंदाने साजरा केला जातो.
-
माघ कृष्ण चतुर्दशी या तिथी दिवशी ‘महाशिवरात्री’ साजरी केली जाते.
-
आज (१ मार्च) महाशिवरात्रीनिमित्त भाविक मंदिरात गर्दी करताना दिसत आहेत.
-
देशभरात ठिकठिकाणी मंदिरांना विद्युत रोषणाई आणि आकर्षक फुलांनी सजावट करण्यात आली आहे.
-
पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून प्रमुख सण, उत्सव, एकादशीनिमित्त मंदिरास विविध फुले, पाने, फळांची आरास करण्यात येते.
-
महाशिवरात्रीनिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरास बेलाच्या पानांची आरास करण्यात आली आहे.
-
श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यास आणि मंदिरात बेलाच्या पानांसोबत झेंडू, शेवंती, मोगरा या फुलांच्या रंगसंगतीचा वापर करून आकर्षक सजावट करण्यात आली आहे.
-
ही आरास करण्यासाठी ७०० किलो बेलाच्या पानांचा वापर करण्यात आला असल्याची माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी दिली.
-
रमेश पांडुरंग कोळी, सौ.राणी रमेश कोळी, ऋतुजा कोळी, ऋषिकेश कोळी आणि नवनाथ खिलारे या भाविकांनी ही आरास श्री चरणी अर्पण केली असून शिंदे ब्रदर्स यांनी ही सजावट करण्यास मदत केली आहे.
-
लाखो वारकऱ्यांचे आराध्य दैवत असलेल्या विठूरायाला शिव वैष्णवांचे प्रतिक मानले जाते.
-
श्री विठ्ठलाच्या मस्तकी शिवलिंग आहे. त्यामुळे ‘हरी हरा भेद नाही करू नये वाद’ या अभंगाप्रमाणे शिव आणि विष्णू हे एकच मानले जाते.
-
तर दुसरीकडे राजमाता आहिल्यादेवी होळकर या शिवभक्त होत्या. त्यांनी महाशिवरात्री दिवशी गंगेच्या पाण्याचा महाभिषेक करण्याची परंपरा सुरु केली.
-
“२५० वर्षांच्या परंपरेनुसार मध्यरात्री १२ वाजता गंगा नदीचे उगम असलेल्या गंगोत्री येथून कलशाने देवाला अभिषेक केला”, अशी माहिती राजमाता अहिल्यादेवी होळकर संस्थांचे व्यवस्थापक दादा फत्तेपूरकर यांनी दिली.
-
बेलाच्या पानांची आरास केल्यामुळे देवाचे लोभस रूप अधिकच खुलून दिसत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती, पंढरपूर )

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”