-
पंतप्रधान नरेंद्र मोदी परवा म्हणजेच ६ मार्च रोजी पुण्यात येणार आहेत. भाजपाकडून त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू आहे.
-
मोदींच्या मार्गातील रस्ते दुरुस्ती, अतिक्रमणे हटवणं, स्वच्छता करणं सध्या सुरु आहे. त्यांच्यासाठी एक विशिष्ट प्रकारचा फेटाही तयार करण्यात आला आहे.
-
फेट्याची थीम ऐतिहासिक आहे. या फेट्याचा रंग निवडताना पंतप्रधान मोदी ज्या प्रकारचे कपडे घालतात, त्याचा विचार कऱण्यात आला आहे.लाल रंग ऐतिहासिकतेचा प्रतिक म्हणून वापरण्यात आला आहे.
-
या फेट्यावर सजवलेले दागिने गोल्ड प्लेटेड आहेत. ऑस्ट्रेलियन हिरे वापरले आहेत आणि मोत्यांची सजावट केली आहे. मोत्यांच्या सूर्यफुलात छत्रपती शिवरायांची राजमुद्रा बसवण्यात आली आहे.
-
राष्ट्र चालवताना तेजाकडे, राजमुद्राकडे लक्ष राहावं, शिवरायांच्या विचारावर चालता यावं हा राजमुद्रा लावण्यामागचा विचार आहे.
-
उन्हाळ्याच्या दृष्टीनेही काळजी घेण्यात आली असल्याने हा फेटा हलका, रेशमी कापडाचा आहे.
-
त्याचबरोबर गरम होऊ नये म्हणून व्हेंटिलेशनची सोयही या फेट्यात करण्यात आली आहे.
-
पुण्याचे प्रसिद्ध फेटेवाले मुरुडकर यांनी हा फेटा तयार केला आहे.
![how this old lady used to look at young age](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/Add-a-heading-76.jpg?w=300&h=200&crop=1)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”