-
रॉयल एनफिल्डने अखेर भारतात नवीन Himalayan Scram 411 लाँच केली आहे. या मोटरसायकलची किंमत २.०३ लाख रुपयांपासून सुरू होते आणि २.०८ लाख रुपयांपर्यंत (एक्स शोरुम) जाते. (Photo- Royal Enfield)
-
Royal Enfield Scram 411 कंपनीच्या हिमालयन साहसी बाइकवर आधारित आहे. (Photo- Royal Enfield)
-
रॉयल एनफिल्ड ही मोटरसायकल एकूण सात कलर शेडमध्ये आहे. व्हाईट फ्लेम, सिल्व्हर स्पिरिट, ब्लेझिंग ब्लॅक, स्कायलाइन ब्लू, ग्रेफाइट रेड, ग्रेफाइट ब्लू आणि ग्रेफाइट यलो या रंगात आहे. (Photo- Royal Enfield)
-
सिंगल-पीस सीट, हेडलॅम्पभोवती कास्ट मेटल काउल, ऑफसेट स्पीडोमीटर आहे. इंधन टाकीच्या आजूबाजूच्या प्लास्टिकच्या बिट्सचीही पुनर्रचना केली आहे आणि त्याला नवीन ग्रॅब्रेल दिले आहे. (Photo- Royal Enfield)
-
कंपनी तिच्या ‘MiY’ (मेक इट युअर्स) कस्टमायझेशन प्रोग्रामचा एक भाग म्हणून ट्रिपर नेव्हिगेशन पॉडसह अनेक ऍक्सेसरीज ऑफर करत आहे. (Photo- Royal Enfield)
-
गाडीत ४११ सीसी इंजिन असून सिंगल-सिलेंडर, एओएचसी, एअर-कूल्ड आणि इंधन-इंजेक्ट तंत्रावर आधारित आहे. (Photo- Royal Enfield)
-
Royal Enfield Scram 411 २४.३ एचपी पॉवर आणि ३२ एनएम टॉर्क जनरेट करते. इंजिन 5-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. (Photo- Royal Enfield)
-
ब्रेकिंगसाठी पुढे ३१० एमएम डिस्क ब्रेक आणि मागे २४० एमएम डिस्क युनिट ड्युअल-चॅनल ABS सोबत मिळते. (Photo- Royal Enfield)
-
नवीन रॉयल एनफिल्ड हिमालयन स्क्रॅम 411 थेट येझदी स्क्रॅम्बलरला टक्कर देईल. तसेच बजाज Dominar 250, Suzuki Gixxer 250 यांच्याशी स्पर्धा असेल. (Photo- Royal Enfield)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”