-
रॉयल एनफिल्डने अखेर भारतात नवीन Himalayan Scram 411 लाँच केली आहे. या मोटरसायकलची किंमत २.०३ लाख रुपयांपासून सुरू होते आणि २.०८ लाख रुपयांपर्यंत (एक्स शोरुम) जाते. (Photo- Royal Enfield)
-
Royal Enfield Scram 411 कंपनीच्या हिमालयन साहसी बाइकवर आधारित आहे. (Photo- Royal Enfield)
-
रॉयल एनफिल्ड ही मोटरसायकल एकूण सात कलर शेडमध्ये आहे. व्हाईट फ्लेम, सिल्व्हर स्पिरिट, ब्लेझिंग ब्लॅक, स्कायलाइन ब्लू, ग्रेफाइट रेड, ग्रेफाइट ब्लू आणि ग्रेफाइट यलो या रंगात आहे. (Photo- Royal Enfield)
-
सिंगल-पीस सीट, हेडलॅम्पभोवती कास्ट मेटल काउल, ऑफसेट स्पीडोमीटर आहे. इंधन टाकीच्या आजूबाजूच्या प्लास्टिकच्या बिट्सचीही पुनर्रचना केली आहे आणि त्याला नवीन ग्रॅब्रेल दिले आहे. (Photo- Royal Enfield)
-
कंपनी तिच्या ‘MiY’ (मेक इट युअर्स) कस्टमायझेशन प्रोग्रामचा एक भाग म्हणून ट्रिपर नेव्हिगेशन पॉडसह अनेक ऍक्सेसरीज ऑफर करत आहे. (Photo- Royal Enfield)
-
गाडीत ४११ सीसी इंजिन असून सिंगल-सिलेंडर, एओएचसी, एअर-कूल्ड आणि इंधन-इंजेक्ट तंत्रावर आधारित आहे. (Photo- Royal Enfield)
-
Royal Enfield Scram 411 २४.३ एचपी पॉवर आणि ३२ एनएम टॉर्क जनरेट करते. इंजिन 5-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. (Photo- Royal Enfield)
-
ब्रेकिंगसाठी पुढे ३१० एमएम डिस्क ब्रेक आणि मागे २४० एमएम डिस्क युनिट ड्युअल-चॅनल ABS सोबत मिळते. (Photo- Royal Enfield)
-
नवीन रॉयल एनफिल्ड हिमालयन स्क्रॅम 411 थेट येझदी स्क्रॅम्बलरला टक्कर देईल. तसेच बजाज Dominar 250, Suzuki Gixxer 250 यांच्याशी स्पर्धा असेल. (Photo- Royal Enfield)
Photo: रॉयल एनफिल्डची Scram 411 लाँच, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स
रॉयल एनफिल्डने अखेर भारतात नवीन Himalayan Scram 411 लाँच केली आहे. या मोटरसायकलची किंमत २.०३ लाख रुपयांपासून सुरू होते आणि २.०८ लाख रुपयांपर्यंत (एक्स शोरुम) जाते.
Web Title: Royal enfield scram 411 launched know price and feature rmt