-
दोन वर्षांपासून असलेले करोनाचे संकट कमी झाल्यामुळे यंदा होळी, धुळवडीच्या सणाच्या निमित्ताने बाजाराला नवा रंग चढला आहे.
-
करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे यंदा हे दोन्ही दिवस जल्लोषात साजरे करण्यासाठी नागरिक सज्ज झाले असून त्यांच्या दिमतीला बाजारपेठही सजली आहे.
-
वेगवेगळ्या आकारांतील आकर्षक पिचकाऱ्या, रंगांचे प्रकार, रंगीबेरंगी कपडे यांची बाजारात रेलचेल असून त्यांच्या खरेदीसाठी नागरिक गर्दी करत आहेत.
-
यंदा विक्रीसाठी बहुतांश पिचकाऱ्या देशी बनावटीच्या आहेत.
-
यामध्ये स्पायडरमॅन, मोटू पतलू, डॉरेमन, कॅप्टन अमेरिका, फ्रोझन, अल्क, तर खास मुलींसाठी गुलाबी रंगाच्या बारबी डॉल अशा विविध कार्टूनच्या आकाराचे तसेच मंकी, रॅबिट या प्राण्यांच्या आकाराच्या आणि टरबूज, किलगड, संत्रे या फळांच्या चित्ररूपात विविध आकर्षक पिचकाऱ्या बाजारात उपलब्ध आहेत.
-
बाजारात खास धुळवडीच्या दिवशी परिधान करण्यासाठी आकर्षक टीशर्ट, कुर्ते, मुलींचे टॉपही उपलब्ध झाले आहेत. (सर्व फोटो : नरेंद्र वासकर, इंडियन एक्सप्रेस)

डोंबिवलीत ‘हे’ चाललंय काय? भर दुपारी लोकलमध्ये तरुणानं नशेत काय केलं पाहा; VIDEO पाहून धडकी भरेल