-
पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिरात भाविक दर्शनासाठी येत असतात.
-
आज देखील संकष्टी चतुर्थीनिमित्त भाविक सकाळपासूनच गर्दी करत आहेत.
-
खास संकष्टी चतुर्थीनिमित्त मंदिराला द्राक्षांची आरास करण्यात आली आहे.
-
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे काळ्या आणि हिरव्या द्राक्षांनी मंदिरास सजावट करण्यात आली.
-
नाशिक येथील सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या शेतकऱ्यांनी पिकवलेली द्राक्षे आरास करण्यासाठी वापरण्यात आली.
-
सुमारे दोन हजार किलो द्राक्षे या सजावटीसाठी वापरण्यात आली आहेत.
-
संकष्टी चतुर्थीनिमित्त सजलेले श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिर.
-
शेतकऱ्यांनी पिकवलेल्या केमिकल विरहित द्राक्षांचा वापर या सजावटीसाठी करण्यात आला.
-
काळ्या आणि हिरव्या द्राक्षांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिरातील गाभारा आणि सभामंडप सजला होता.
-
यावेळी ट्रस्टचे सुनील रासने, महेश सूर्यवंशी, कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे यांसह सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे पदाधिकारी देखील उपस्थित होते.
-
श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिरात केलेली आकर्षक आरास पाहण्याकरता भाविकांनी गर्दी केली होती.
-
( सर्व फोटो : सागर कासार / लोकसत्ता)
५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ