-
पुण्यातील कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालय तब्बल दोन वर्षांनंतर पर्यटकांसाठी २० मार्चपासून पुन्हा सुरू करण्यात आले.
-
करोनाच्या पार्श्वभूमीवर हे प्राणी संग्रहालय सर्वसामान्यांसाठी बंद ठेवण्यात आले होते.
-
पर्यटनाच्या दृष्टीनं महत्त्वाच्या असलेल्या कात्रजमधील राजीव गांधी प्राणी संग्रहालयामध्ये नेहमीच पर्यटकांची गर्दी असते.
-
या प्राणी संग्रहालयातील प्राण्यांची विशेष काळजी घेतली जाते. आता उन्हाळा सुरू झाल्यामुळे प्राण्यांच्या आरोग्याकडे लक्ष दिले जात आहे.
-
उष्णतेमुळे होणारा त्रास कमी करण्यासाठी प्राणी संग्रहालयामध्ये प्राण्यांसाठी हौद देखील बांधण्यात आला आहे.
-
या हौदामध्ये संग्रहालयातील हत्ती मनसोक्त मस्ती करताना दिसत आहेत.
-
प्राणी संग्रहालयातील हत्तीणी जानकी आणि मीरा.
-
“आता उन्हाळा सुरू झाल्याने आम्ही प्रत्येक प्राण्याची काळजी घेत आहोत. त्याचाच एक भाग म्हणून हत्तीला दिवसभरात तीन वेळा पाण्याचा शॉवर दिला जातो. तसेच अन्य प्राण्यांसाठी कुलरची व्यवस्था केली आहे.”, असं राजीव गांधी प्राणी संग्रहालयाचे व्यवस्थापक राजकुमार जाधव यांनी सांगितले.
-
(सर्व फोटो : सागर कासार/ लोकसत्ता)
५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ