-
लढाऊ, चिवट आणि देखणा अश्व अशी ओळख असलेल्या मारवाडी प्रजातीचे घोडे पाहण्यासाठी पुणेकरांनी गुरुवारी गर्दी केली. (सर्व फोटो : आशिष काळे, द इंडियन एक्सप्रेस)
-
इंडिजिनस हॉर्स ओनर्स असोसिएशनतर्फे आयोजित मारवाडी हाॅर्स शो मध्ये पुणेकरांना हे घोडे पहायला मिळाले.
-
नागरिकांना विनामूल्य प्रवेश असल्याने उन्हामध्येही नागरिकांनी आवर्जून रेसकोर्सला भेट दिली.
-
गुजरात, पंजाब, आंध्रप्रदेश, कर्नाटक, मध्यप्रदेश या राज्यातून सव्वाशे ते दीडशे अश्व या स्पर्धेत सहभागी झाले आहेत.
-
यामध्ये मिल्क टीथ फिली, मिल्क टीथ कोल्ट, टू टीथ फिली, टू टीथ कोल्ट या प्रकारातील नर आणि मादी अश्वांचा समावेश आहे.
-
घोड्यांच्या वयोगटानुसार सहा विभागांमध्ये उत्कृष्ट घोड्यांची स्पर्धा घेण्यात येत आहे.
-
मारवाडी घोडे आणि त्यांचा रूबाब पाहण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
-
इंडिजिनस हॉर्स ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष अजय नॅन्सी यांनी या स्पर्धेसंदर्भातील सविस्तर माहिती दिली.
-
शुक्रवारी (१ एप्रिल) दुपारी अडीच ते रात्री साडेआठ या वेळात अंतिम फेरी झाल्यांतर स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट अश्व पुरस्कार जाहीर करण्यात येईल.
-
उद्याही पुणेकरांना हे घोडे पाहण्याची संधी उपलब्ध असणार आहे.

५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ