-
मराठी नववर्ष अर्थाच गुढीपाडव्याची मुंबईत जंगी तयारी झाली असून नेहमीप्रमाणे गिरगाव हे आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. (फोटो : गणेश शिर्सेकर, इंडियन एक्सप्रेस)
-
दोन वर्षांनंतर गिरगावात गुढीपाडव्यानिमित्त स्वागतयात्रा निघणार असून त्यासाठी परिसरातील विविध सामाजिक, सांस्कृतिक संस्थांची लगबग सुरू आहे. (फोटो : दीपक जोशी, इंडियन एक्सप्रेस)
-
याच स्वागतयात्रेत यंदा २० फूट उंचीची मुंबादेवीची भव्य प्रतिमा दिसणार आहे. (फोटो : गणेश शिर्सेकर, इंडियन एक्सप्रेस)
-
सध्या या प्रतिमेच्या सजावटीचे अंतिम टप्प्यातील कां सुरू आहे. (फोटो : गणेश शिर्सेकर, इंडियन एक्सप्रेस)
-
करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन वर्षांत लागू असलेल्या निर्बंधांमुळे मराठी नववर्षांनिमित्त होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रम आणि शोभायात्रेवर बंदी होती. (फोटो : दीपक जोशी, इंडियन एक्सप्रेस)
-
आता करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे राज्य शासनाने सर्व निर्बंध हटवले आहे. (फोटो : गणेश शिर्सेकर, इंडियन एक्सप्रेस)
-
यामुळे यंदाचा गुढीपाडवा धुमधडाक्यात साजरा केला जाणार आहे. (फोटो : दीपक जोशी, इंडियन एक्सप्रेस)
-
सांस्कृतिक कार्यक्रमाच्या आयोजनाची पूर्वतयारी जोरात सुरू झाली आहे. (फोटो : गणेश शिर्सेकर, इंडियन एक्सप्रेस)
-
गुढीपाडव्यापासून चैत्र नवरात्र आणि मराठी नववर्षांला प्रारंभ होतो. (फोटो : दीपक जोशी, इंडियन एक्सप्रेस)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”