चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमेला हनुमान जयंती साजरी केली जाते. या दिवशी महाबली हनुमानजींचा जन्म झाला असे मानले जाते. यंदा हनुमान जयंती १६ एप्रिलला साजरी होणार आहे. हनुमान जयंतीच्या दिवशी नियमानुसार पवनपुत्र हनुमान देवाची पूजा केल्यास ते प्रसन्न होतात, अशी धार्मिक मान्यता आहे. ज्याने जीवनातील सर्व संकटे दूर होतात. चला जाणून घेऊया हनुमान जयंतीच्या दिवशी काय करणे शुभ राहील.
-
असे मानले जाते की हनुमान जयंतीच्या दिवशी श्लोकाचे पठण करतात त्याच्या घरात किंवा आजूबाजूला भूत, पिशाच्च आणि नकारात्मक शक्ती येत नाही. (photo credit: finanacial express)
-
अनेक वेळा लोकं नेहमी कोणत्या न कोणत्या गोष्टी ऐकल्या की घाबरतात. अशा स्थितीत हनुमान जयंतीच्या दिवशी सकाळी मारुतीच्या मंदिरात जाऊन रुद्राक्षाच्या जपमाळाने खाली दिलेल्या मंत्राचा अकराशे वेळा जप करावा. असे केल्याने सर्व प्रकारच्या अडथळ्यांपासून मुक्ती मिळते. मंत्र आहे – ऊं हं हनुमंते नम: (photo credit: jansatta)
-
काही लोकं खूप आजारी पडत असतात. अशा स्थितीत हनुमान जयंतीला हनुमान चाळिसा यातील चौपईचा पाठ केल्यास रोग व्याधी कमी होतात. याशिवाय जे या चौपईचे नियमित पठण करतात, त्यांच्यावर हनुमानजींची विशेष कृपा असते. (photo credit: jansatta)
-
कोणत्याही विशेष मनोकामना पूर्ण होण्यासाठी हनुमान जयंतीच्या दिवशी ‘ओम महाबलय वीराय चिरंजीवं उद्देते, हरिणे वज्र देहे चोलंगितमहाव्यये’ या मंत्राचा १०८ वेळा जप करा. (photo credit: finanacial express)
-
हनुमानजींच्या आशीर्वादासाठी विद्यार्थ्यांनी हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमान चालिसाचे पठण करावे. असे केल्याने स्मरणशक्ती वाढते आणि शिक्षणात यश मिळते असे मानले जाते. (photo credit: jansatta)