-
महाराष्ट्र केसरीच्या गदेसाठी कोल्हापूरचा पृथ्वीराज पाटील विरूद्ध मुंबई पूर्वचा विशाल बनकर यांच्यात अटीतटीची लढत झाली. यामध्ये पृथ्वीराज पाटील याने विशाल बनकर याचा पराभव करत, २०२२ ची महाराष्ट्र केसरीची गदा पटकावली.
-
तब्बल २१ वर्षा नंतर कुस्तीची पंढरी असलेल्या कोल्हापुरात महाराष्ट्र केसरीची प्रतिष्ठेची गदा पृथ्वीराज पाटील यांच्या रूपाने आली आहे.
-
पृथ्वीराजने चार गुणांची पिछाडी भरून काढत पाच विरुद्ध चार असा विजय मिळवला.
-
या दैदीप्यमान यशानंतर कोल्हापुरात पृथ्वीराजवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
-
पन्हाळा तालुक्यातील देवठाणे या गावच्या पृथ्वीराजने शाहू कुस्ती केंद्र शिंगणापूर येथे सुरुवातीला कुस्तीचा सराव केला.
-
त्याचे काका संग्राम पाटील, जालिंदर मुंडे आदींनी त्यास मार्गदर्शन केले.
-
जागतिक कुमार स्पर्धेत कास्यपदक मिळाल्याने त्यास सैन्यदलात नोकरीची संधी मिळाली.
-
तर दुसरीकडे ट्रिपल महाराष्ट्र केसरी, पोलीस उपाधीक्षक नरसिंग यादव यांच्यासोबत भारतीय कुस्ती शिबिरात त्याचा सराव सुरू असतो.
-
सुरूवातीला पृथ्वीराज आणि विशालची खडाखडी झाली.दोघांनीही एकमेकांची मनगटे धरल्याने पंचांनी त्यांना ही कुस्तीतील निष्क्रियता आहे असे सांगून रोखले होते.
-
पृथ्वीराज २००९ ला मोतीबाग तालमीत दाखल झाला. महान भारत केसरी दादू चौगले यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचा कुस्तीतला प्रवास सुरू झाला.
-
२०२१ ला झालेल्या सिनियर नॅशनल स्पर्धेत सुवर्ण आणि २०२२ ला कास्यपदक पटकावले होते.
-
याचबरोबर खेलो इंडिया २०२० ला सुवर्णपदक पटकावले.
-
तर, २०१९ ला महाराष्ट्र केसरी स्पर्धेत ९२ किलो गटातही त्याने सुवर्णपदक पटकावले होते.
-
पृथ्वीराजने महाराष्ट्र केसरी पदक मिळाल्यानंतर त्याच्यावर समाज माध्यमातून कौतुकाचा वर्षाव सुरू झाला
-
पृथ्वीराजनं अखेरच्या ४५ सेकंदात सामन्याला कलाटणी दिली. त्याने ५-४ अशा फरकाने सामना जिंकत महाराष्ट्र केसरीचा किताब आपल्या नावे केला.
-
या अगोदर पृथ्वीराजने पुणे शहरच्या हर्षद कोकाटेवर एकतर्फी विजयाची नोंद केली होती.
-
पहिल्या राऊंड मध्ये बनकर याने चार गुणांची बढत घेतली होती. पण ही आघाडी मोडून पृथ्वीराज पाटील याने आक्रमक खेळ करत पाच गुण घेतले.
-
पृथ्वीराज हा प्रथमच या स्पर्धेसाठी उतरला होता. आणि पहिल्याच प्रयत्नात त्याने चंदेरी गदा पटकावली.
-
एकेरी प्रकारची पकड करत पृथ्वीराजने शेवटची अडीच मिनिटे जबरदस्त कुस्ती केली.
-
कुस्ती करत असताना मी जे ठरवले होते त्याप्रमाणे कुस्ती होत गेली आणि अंतिम क्षणी मी केलेली खेळी यशस्वी झाली आणि गुणाधिक्यावर मी जिंकलो, असं पृथ्वीवराजने सांगितलं आहे.
-
पहिल्या फेरीत विशालने आपल्या नैसर्गिक उंचीचा फायदा घेत आक्रमक खेळी करून पुरथ्वीराजवर गुणांची आघाडी घेतली होती.
-
राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने सातारा जिल्हा तालीम संघ आयोजित ६४ वी राज्य अजिंक्यपद आणि महाराष्ट्र केसरी स्पर्धा साताऱ्यातील जिल्हा क्रीडा संकुलात पार पडली.

आता ऑफिसमध्ये पाणी पिण्याची पण भीती! पाहा Viral Video तील किळसवाणी घटना