-
विन्टेज अँड क्लासिक कार क्लब ऑफ इंडियाच्या (व्हीसीसीसीआय) वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘विन्टेज कार फिस्टा ड्राइव्ह’चे आयोजन करण्यात आले. (फोटो – प्रदीप दास)
-
कफ परेड येथील वल्र्ड ट्रेड सेंटरजवळ हे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये देशभरातील विविध दुर्मीळ कार आणि मोटारसायकल सहभागी झाल्या होत्या. (फोटो – प्रदीप दास)
-
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) हा कार्यक्रम आयोजित केला होता. (फोटो – प्रदीप दास)
-
पर्यटन व पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आलं. रविवारी सकाळी ९.३० वाजता आदित्य ठाकरेंनी या रॅलीला हिरवा झेंडा दाखवला. (फोटो – प्रदीप दास)
-
मंत्रालय- नरिमन पॉइंट- चौपाटी- बाबुलनाथ- पेडर रोड- हाजी अली- वरळी सीफेस- सागरी सेतू या मार्गावर जाऊन या कार मूळ ठिकाणी परतल्या. (फोटो – प्रदीप दास)
-
१९०४ पासूनच्या दुर्मीळ कार, मोटारसायकल या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. (फोटो – प्रदीप दास)
-
कार बनवण्याच्या क्षेत्रात आघाडीच्या असणाऱ्या रोल्स रॉइस, बेन्टले, फोर्ड, पॅकर्ड आदी कंपन्यांच्या कार या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. (फोटो – प्रदीप दास)
-
सकाळी ११.३० च्या सुमारास बक्षीस वितरणाचा कार्यक्रम पार पडला. (फोटो – प्रदीप दास)
-
यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी अशा प्रकारच्या कार्सचं एक म्युझियम तयार करण्याचा देखील मानस बोलून दाखवला. (फोटो – प्रदीप दास)
-
या गाड्यांवर प्रेम करणारे या गाड्यांची देखभाल देखील करू शकतात. त्यामुळे अशा कार्सचं एखादं म्युझियम देखील तयार करता येऊ शकेल का? यावर विचार सुरू आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले. (फोटो – प्रदीप दास)
-
दरवर्षी अशा प्रकारे जुन्या पण क्लासिक लुकच्या कार्सची रॅली आयोजित केली जाते. हा आगळा वेगळा अनुभव घेण्यासाठी मुंबईकर आतुरतेनं वाट पाहात असतात. (फोटो – प्रदीप दास)
-
मुंबईसोबतच इतरही भागातून लोक या कार्स पाहण्यासाठी मोठी गर्दी करतात. (फोटो – प्रदीप दास)
-
जवळपास सव्वाशे वर्षांपूर्वीच्या कार देखील या रॅलीमध्ये सहभागी होतात. त्यामुळे कारसोबतच त्या काळातल्या इतिहासाच्या आठवणी देखील जाग्या होतात. (फोटो – प्रदीप दास)
-
अनेक नामांकित कंपन्यांच्या कार्स इथे येत असल्यामुळे कारप्रेमींसाठी तर ही एक आगळीवेगळी पर्वणीच ठरते. (फोटो – प्रदीप दास)
-
डोळ्यांचं पारणं फेडणारा हा ‘कार’सोहळा पाहण्यासाठी मूळ रॅलीच्या मार्गाच्या दुतर्फा मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं. (फोटो – प्रदीप दास)
-
गेली दोन वर्ष करोनामुळे फटका बसल्यानंतर आज पुन्हा एकदा या क्लासिक कार्स पाहाण्याचं सुख आणि समाधान प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसून येत होतं. (फोटो – प्रदीप दास)
-
खरंतर अशा प्रकारच्या कार्सचं जतन करणं आणि त्या सुस्थितीत ठेवणं हे एक मोठं आव्हानच असतं. पण कारप्रेमी घरातल्या एका सदस्याप्रमाणे या कार्सची देखभाल करतात. (फोटो – प्रदीप दास)
-
कार्ससोबतच या ड्राईव्हमध्ये अनेक क्लासिक बाईक्स देखील उतरवण्यात आल्या होत्या. (फोटो – प्रदीप दास)
-
क्लासिक कार्सच्या पाठोपाठ जाणाऱ्या या क्लासिक आणि स्टायलिश लुकच्या बाईक्स पाहाणं हा बाईकप्रेमींसाठी अविस्मरणीय क्षण होता. (फोटो – प्रदीप दास)
-
या कार्स आणि बाईक पाहाताना दर्दी हौशींच्या चेहऱ्यावर एक वेगळंच समाधान आणि हास्य दिसून येत होतं. (फोटो – प्रदीप दास)
-
आता इतक्या जुन्या पण क्लासिक गाड्या समोर असताना त्यांच्यासोबत फोटो काढण्याचा मोह कुणाला आवरता आला असता, तरच नवल! (फोटो – प्रदीप दास)
-
अनेक रंगांच्या या कार्समुळे आज सकाळी मुंबईच्या रस्त्यावर जणूकाही कार्सचा फॅशन शो सुरू असल्याचा भास काहींना झाला असण्याची शक्यता अजिबात नाकारता येत नाही! (फोटो – प्रदीप दास)
-
या गाड्या फक्त दाखवणंच नाही, तर त्यांचे मालक त्यांच्याविषयी बघायला येणाऱ्यांना सविस्तर माहिती देखील देत होते. (फोटो – प्रदीप दास)
-
या सर्व विंटेज कार्स आणि बाईक्सच्या रुपानं आज मुंबईच्या रस्त्यांवर जणूकाही इतिहासच पुन्हा अवतरला होता! (फोटो – प्रदीप दास)
होळीनंतर या तीन राशींचे चमकणार सोन्यासारखे नशीब, बँक बॅलेन्समध्ये वाढणार, मिळेल अपार पैसा संपत्ती