-
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती.
-
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त लातुरात ७२ फूट उंचीचा ‘स्टेच्यु ऑफ नॉलेज’ पुतळ्याचे अनावरण विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.
-
केंद्रीय मंत्री रामदास आठवले, खासदार सुधाकर श्रृंगारे, आमदार गिरीश महाजन, संभाजी पाटील निलंगेकर, खासदार प्रताप पाटील चिखलीकर, रमेश अप्पा कराड, अभिमन्यू पवार, विनायकराव पाटील, सुधाकर भालेराव आणि इतरही नेते, पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
-
करोना प्रादुर्भावामुळे गेल्या दोन वर्षांत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साधेपणाने साजरी करण्यात आली.
-
शासनाने आता सर्वच निर्बंध हटवल्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त शहरातील विविध सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक संघटनांकडून मिरवणुका, महाप्रसाद आणि इतर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
-
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त दीक्षाभूमी येथे अनुयायांचा जनसागर लोटतो.
-
डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलितांचे नेते होते, ते राज्यघटनेचे शिल्पकार होते.
-
दलितांना संघटित केले, जो समाज दबला गेला होता त्या समाजाला स्वाभिमानाने आणि स्वत:च्या हक्कांसाठी लढायला डॉ. बाबासाहेबांनी शिकवले.
-
भारतीय समाजाला संवैधानिक, सामाजिक स्वातंत्र्यता मिळून देण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मोलाची कामगिरी केली आहे.
-
अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास ते मानववंशशास्त्र, धर्म, कायदा अशा अनेक विद्याशाखांचा अभ्यास त्यांनी केला फक्त मराठीच नाही तर हिंदी, इंग्रजी, पाली, पर्शियन आदी भाषांवर त्यांनी प्रभुत्त्व मिळवलं.
-
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा हा प्रवास अनेक संघर्षांनी भरलेला होता, पण तरीही जिद्दीने उभं राहून आपल्या समाजाला स्वाभिमानाने जगण्याची प्रेरणा दिली.
-
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन. (सर्व फोटो सौजन्य : देवेंद्र फडणवीस / ट्विटर)

Thirsty Cheetahs Viral Video : तहानलेल्या चित्त्यांना पाणी पाजणं भोवलं! Video व्हायरल होताच वन विभागाचा चालक निलंबित