-
आयपीएल २०२२ स्पर्धेत कर्धणार रवींद्र जडेजाच्या नेतृत्वाखाली चेन्नईचा संघ खेळत आहे. सलग चार पराभवानंतर चेन्नईने विजय मिळवला आहे. बंगळुरुचा २३ धावांनी पराभव केला. हा विजय जडेजाने पत्नीला समर्पित केला आहे. (Photo- Rivaba Instagram)
-
२०१६ आयपीएल स्पर्धेदरम्यान रवींद्र जडेजाचं रिवाबा सोलंकीसोबत लग्न झालं. रिवाबा इंजिनिअर आहे. त्याचबरोबर सामाजिक कार्यात सक्रिय असते. (Photo- Rivaba Instagram)
-
२०१५ साली बहिणीच्या सांगण्यावरून रिवाबाला भेटण्यास रवींद्र जडेजाने होकार दिला होता. पहिल्या भेटीतच तिच्या प्रेमात पडला. त्यानंतर लग्नाबाबत विचारत २०१६ साली लग्न केलं. (Photo- Rivaba Instagram)
-
रिवाबा जडेजाचा जन्म ५ सप्टेंबर १९९० रोजी राजकोट, गुजरात येथे झाला. तिचे वडील हरदेव सिंग हे एक व्यापारी आणि तिची आई प्रफुल्लबा सोलंकी भारतीय रेल्वेत काम करत होती. प्रसिद्ध काँग्रेस नेते हरीसिंह सोलंकी यांची भाची आहे. (Photo- Rivaba Instagram)
-
रिवाबा आजही राजकारणात सक्रिय आहेत. तिने २०१९ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. गुजरातचे कृषी मंत्री आर सी फाल्दू आणि जामनगरच्या खासदार पूनम मदाम यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला. २०१९ पूर्वी त्या करणी सेनेच्या महिला शाखेच्याही प्रमुख होत्या. (Photo- Rivaba Instagram)

३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख