-
भारतीय कार खरेदीदारांचा आता सुरक्षित कार घेण्याकडे कल वाढला आहे. ग्लोबल NCAP कडून क्रॅश चाचणी रेटिंग मिळालेल्या गाड्या खरेदीसाठी पसंती दिली जात आहे.
-
महिंद्राच्या XUV700 कारने भारतातील टॉप ५ सुरक्षित कारच्या यादीत अव्वल स्थान पटकावले आहे. महिंद्रा XUV700 ला प्रौढांच्या सुरक्षिततेसाठी ५-स्टार रेटिंग आहे. तसेच, लहान मुलांच्या सुरक्षेसाठी ४-स्टार रेटिंग प्राप्त झाली आहे.
-
टाटा पंच या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. यात प्रौढांच्या सुरक्षिततेसाठी आणि मुलांच्या सुरक्षा रेटिंगसाठी अनुक्रमे ५-स्टार आणि ४-स्टार रेटिंग मिळाले आहेत.
-
महिंद्रा XUV300 ने सुरक्षेच्या यादीत तिसरे स्थान मिळवले आहे. ग्लोबल NCAP च्या टेस्टबेडवर प्रौढांच्या सुरक्षेसाठी एकूण १७ पैकी १६.४२ गुण आणि बालकांच्या सुरक्षिततेसाठी ४९ पैकी ३७.४४ गुण मिळवले आहेत.
-
Tata Altroz ही देशातील सर्वात सुरक्षित हॅचबॅक आहे. यात प्रौढांच्या संरक्षणासाठी ५ स्टार आणि लहान मुलांच्या संरक्षणासाठी ३ स्टार ग्लोबल NCAP रेटिंग आहे.
-
भारतातील टॉप 5 सर्वात सुरक्षित कारच्या यादीतील शेवटचा स्पर्धक Tata Nexon आहे, ज्याची प्रौढांसाठी ५-स्टार क्रॅश चाचणी रेटिंग आणि लहान मुलांसाठी ३-स्टार रेटिंग आहे.

बॉलीवूड अभिनेत्री ४१ व्या वर्षी दुसऱ्यांदा होणार आई, १२ वर्षांनी लहान आहे पती, जोडप्याने शेअर केला खास Video