-
वागशीर ही स्कॉर्पिन वर्गातील सहावी आणि अखेरची पाणबुडी आहे. प्रकल्प-७५ अंतर्गत एकूण सहा पाणबुड्यांची निर्मिती करण्यात आली. (फोटो – प्रदीप दास, इंडियन एक्सप्रेस)
-
स्कॉर्पिन वर्गाला देशात कलवरी वर्गातील पाणबुड्या या नावाने ओळखले जातात. कलवरी, खंदेरी, करंज, वेला या पाणबुड्या नौदलात दाखल, वागीरच्या समुद्री चाचण्या सुरु आहेत. (फोटो – प्रदीप दास, इंडियन एक्सप्रेस)
-
आयएनएस वागशीरचे जलावतरण झाले असून लवकरच समुद्रातील चाचण्यांना सुरुवात होणार आहे. (फोटो – प्रदीप दास, इंडियन एक्सप्रेस)
-
सुमारे १७०० टन वजनाच्या कलवरी वर्गातील पाणबुड्या या सलग ५० दिवस समुद्रात कार्यरत राहू शकतात. (फोटो – प्रदीप दास, इंडियन एक्सप्रेस)
-
एक दमात १२ हजार किलोमीटर अंतर पार करण्याची या पाणबुड्यांची क्षमता असून अत्याधुनिक Exocet क्षेपणास्त्र आणि पाणतीरांनी ( torpedo) ही पाणबुडी सज्ज आहे.
-
कलवरी वर्गातील पाणबुड्या या डिझेल-इलेक्ट्रिक प्रणालीवर चालतात आणि जगात सर्वोत्कृष्ठ म्हणून ओळखल्या जातात.
-
पाणबुडीच्या तंत्रज्ञान हस्तांतरणात उशीर झाल्याने पाणबुड्या बांधण्याचा कार्यक्रमाला चार वर्षे उशीर झाला हे विशेष.
-
कलवरी वर्गातील सहावी आणि अखेरची पाणबुडी बांधण्याचे काम माझगाव डॉकयार्डने पुर्ण केले आहे.
-
भारताला आणखी पाणबुड्यांची आवश्यकता असून आता आणखी कोणत्या प्रकारच्या पाणबुड्या बांधण्याबाबत निर्णय घेतला जातो याकडे संरक्षण क्षेत्राशी संबंधित सर्वांचे लक्ष लागलेले असेल.

हँडसम हिरोशी लग्न का नाही केलं? करण जोहरच्या प्रश्नावर माधुरी दीक्षितने दिलेलं ‘हे’ उत्तर; लाजत म्हणालेली, “माझा नवरा…”