-
महाराष्ट्र दिनी म्हणजे १ मे रोजी(उद्या) औरंगाबादमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा होणार आहे. (फोटो – आशिष काळे आणि सागर कासार)
-
या बहुचर्चित सभेसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे आज सकाळी पुण्याहून औरंगाबादकडे रवाना झाले.
-
मात्र तत्पूर्वी ही आणि भविष्यातील सर्व सभा निर्विघ्नपणे पार पडाव्यात यासाठी राज ठाकरे यांना आशीर्वाद देण्यात आले.
-
यासाठी पुण्यातील जवळपास १०० ते १५० पुरोहितांनी चारही वेदांमधील मंत्रोच्चारांचे पठण करत राज ठाकरे यांना आशीर्वाद दिला.
-
यासाठी पुण्यातील राजमहाल येथे सकाळीच ब्रह्मवृंद मोठ्यासंख्येने हजर देखील झाले होते.
-
आज पुण्यातून राज ठाकरे औरंगाबादला रवाना होणार असल्याने सकाळपासूनच मनसे पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह माध्यम प्रतिनिधींनी मोठ्या संख्यने राजमहाल येथे गर्दी केली होती.
-
सकाळी साधारण दहा वाजेच्या सुमारास राज ठाकरे बाहेर आले, यानंतर त्यांना उपस्थित पुरोहितांनी मंत्रोच्चार करून आशीर्वाद दिले.
-
राज ठाकरे यांच्या उद्याच्या आणि पुढील सभेत यश प्राप्त होण्यासाठी संपूर्ण पुणे शहराच्या वतीने आणि पुरोहित वर्गाच्या वतीने आम्ही मंत्रांद्वारे आशीर्वाद देणार असल्याचे गुरुजी मनोज पारगावकर म्हणाले.
-
दीर्घ आयुष्य, आरोग्य, ऐश्वर्य प्राप्त व्हावे आणि त्यांची जी हिंदूजननायकाची भूमिका आहे. त्या करिता मंत्रांचा, दैवतांचा आशीर्वाद आणि पाठींबा देण्यासाठी आम्ही आलो आहोत, असंही ते म्हणाले.
-
तसेच, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद या चारही वेदांमधील मंत्रांचा आशीर्वाद दिला जाणार असल्याची त्यांनी यावेळी माहिती दिली होती.
-
राज ठाकरे यांची बहुचर्चित अशी औरंगाबाद येथील सभा उद्या होणार असून त्याकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष आहे.
-
औरंगाबादला जात असताना राज ठाकरे वढू-तुळपूर येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळाला भेट देणार आहेत.
-
या ठिकाणी राज ठाकरे समाधी स्थळाचं दर्शन घेऊन पुढील दौऱ्यासाठी निघणार असल्याचं, मनसे शहारध्यक्ष साईनाथ बाबर यांनी स्पष्ट केलंय.
-
राज ठाकरेंच्या या सभेबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे.
-
शिवाय, या सभेच्या अगोदर देखील परवानगी नाट्य रंगल्याचं दिसून आलं होतं, अखेर ही सभा नियम आणि अटींसह होणार आहे.
-
औरंगाबादेतील राजकीय परिस्थिती पाहता, राज ठाकरे नेमकं काय बोलतील आणि त्याचे काय पडसाद उमटू शकतात, याबाबत देखील चर्चा सुरू आहे.
-
राज ठाकरेंची आज चित्रपट दिग्दर्शक केदार शिंदे आणि अभिनेता अंकुश चौधरी यांनी देखील भेट घेतली.
-
औरंगाबादच्या सभेसाठी राज ठाकरे रवाना होत असताना शंखनाद देखील केला गेला.

४ मार्च राशिभविष्य: सूर्याचा पूर्वा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश ‘या’ राशींचे पालटणार नशीब; धनलाभासह आयुष्य बदलण्याची मिळेल संधी