-
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंची आज औरंगाबादमध्ये सभा होणार आहे. मुंबई आणि ठाण्यानंतर होत असलेल्या राज ठाकरेंच्या या सभेकडे सध्या संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.
-
राज ठाकरेंनी मशिदींवरील भोंगे हटवण्यासाठी दिलेल्या अल्टिमेटमसाठी दोन दिवस शिल्लक असताना होणाऱ्या या सभेत राज ठाकरे काय भूमिका घेतात याची उत्सुकता आहे.
-
औरंगाबादमध्ये होणाऱ्या सभेसाठी राज ठाकरे हे काल(३० एप्रिल) सकाळी पुण्याहून औरंगाबादकडे रवाना झाले. यावेळी पुण्यातील जवळपास १०० ते १५० पुरोहितांनी चारही वेदांमधील मंत्रोच्चारांचे पठण करत राज ठाकरे यांना आशीर्वाद दिला.
-
राज ठाकरेंच्या औरंगाबादमध्ये होणाऱ्या सभेसाठी जोरदार तयारी सुरू आहे. या सभेसाठी औरंगाबाद येथील मैदानात भव्य सभामंडप उभारण्यात आला आहे.
-
या सभामंडपात नागरिकांना बसण्यासाठी खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.
-
राज ठाकरेंचं भाषण ऐकण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत. हजारो श्रोत्यांच्या उपस्थितीत राज ठाकरेंची औरंगाबादमधील सभा पार पडणार आहे.
-
सभामंडपातील या व्यासपीठावरून राज ठाकरेंची भाषणाची तोफ धडाडणार आहे.
-
औरंगाबादमधील सभेत राज ठाकरे नेमकं काय बोलतील आणि त्याचे काय पडसाद उमटू शकतात, याबाबत देखील चर्चा सुरू आहे.
-
(सर्व फोटो : अमित चक्रवर्ती, इंडियन एक्सप्रेस)

मुंबईतल्या अंधेरी स्टेशनवर कपल झालं बेभान; रोमान्स करताना अक्षरश: हद्दच पार केली, लाजीरवाणा VIDEO होतोय व्हायरल