-
जवळची व्यक्ती किंवा मित्र कर्ज घेताना आपली आठवण काढतो. बँकेला हमी देण्यासाठी आपल्या पाठी लागतो.
-
एकदा हमी घेतली की आपली बँकेप्रती जबाबदारी वाढते. कारण मित्राने कर्जाचे हफ्ते फेडले नाही. तर बँकेचा तगदा आपल्या मागे लागतो.
-
हमीदार बँकेला हमी देतो की कर्जदार कर्जाची परतफेड करेल. कर्जदार असे करण्यात अयशस्वी झाल्यास, हमीदार कर्जाची परतफेड करेल.
-
अनेक वेळेस उद्योगाला कर्ज देताना बँका/आर्थिक संस्था आपल्या कर्जाला सुरक्षित करण्यासाठी मालमत्ता तारण ठेवायला सांगतात.
-
दोन प्रकारचे हमीदार असतात. एक म्हणजे गैर-आर्थिक हमीदार आणि दुसरा आर्थिक हमीदार.
-
गैर-आर्थिक हमीदार तुमचा वापर फक्त संवादासाठी केला जाईल. तर दुसऱ्या प्रकरणात कर्जदाराने पैसे न भरल्यास तुमच्याकडून वसुली केली जाईल.
-
कर्ज घेणारा व्यक्ती कितीही जवळचा असला तरी त्याचा क्रेडीट स्कोअर तपासून बघा. तसेच त्याच्या कर्जाबाबत माहिती घ्या.
-
जर कर्जदाराने कर्ज भरलं नाही तर आपली मालमत्ता अडचणीत येऊ शकते.
-
कर्जदार कर्ज भरण्यास अपयशी ठरल्यासर त्याचा क्रेडिट स्कोअर खराब होईल तसेच तुमच्या स्कोअरवरही परिणाम होईल.
Video: चांगल्या कर्माचे फळ चांगलेच! काळ आला होता; पण…! गटाराचे उघडे झाकण लावायला गेला अन् चमत्कार झाला, दोन सेकंदांतच…