-
पुणे रेल्वे स्थानकात स्फोट घडवून आणण्यासाठी वापरली जाणाऱ्या वस्तूंसारखी एक संशयास्पद वस्तू सापडल्याने शुक्रवारी एकच खळबळ उडाली. (फोटो – पवन खेंग्रे)
-
ही संशयास्पद वस्तू सापडल्यानंतर रेल्वे स्टेशन परिसरातील प्लॅटफॉर्म क्रमांक एक आणि दोन रिकामा करण्यात आला, तसेच रेल्वे वाहतूक थांबवण्यात आली. (फोटो – पवन खेंग्रे)
-
बॉम्ब शोधक पथकाने मोकळ्या जागेत ही संशयास्पद वस्तू निकामी करण्यासाठी नेली. (फोटो प्रातिनिधिक)
-
पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता घटनास्थळी दाखल झाले आहेत. (फोटो – सागर कासार)
-
रेल्वे स्थानक परिसराचा आढावा पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी घेतला. (फोटो – सागर कासार)
-
अमिताभ गुप्ता हे अधिकाऱ्यांशी बराच वेळ चर्चा करताना दिसले. (फोटो – सागर कासार)
-
पुण्याचे सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिकही घटनास्थळी दाखल झाले असून ते घडमोडींवर नजर ठेऊन आहेत. (फोटो – सागर कासार)
-
बॉम्ब शोधक पथकाने मोकळ्या जागेत जाऊन तपासणी केली असता या जिलेटीनच्या कांड्या असल्याचं स्पष्ट झालं.
-
“साडेदहा वाजता स्थानकावर संशयास्पद वस्तू सापडल्याची माहिती मिळाली,” अस पोलीस आयुक्त म्हणाले आहेत. (फोटो – सागर कासार)
-
प्राथमिक माहितीच्या आधारे प्रसारमाध्यमांना पहिली प्रतिक्रिया देताना या जिलेटीनच्या कांड्या नसल्याचंही पोलीस आयुक्तांनी म्हटलेलं. “पण तपासणी सुरु आहे. सध्या प्राथमिक माहिती आहे त्यामुळे जास्त सांगू शकत नाही. लोकांनी घाबरण्याचं कारण नाही,” असं पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितलं. (फोटो – सागर कासार)
-
पुणे रेल्वे स्थानकावर संशयास्पद गोष्ट सापडल्याची माहिती मिळताच अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. (फोटो – सागर कासार)
-
सामान्यपणे दुपारी पुणे रेल्वे स्थानकात गजबजाट असणारे प्लॅटफॉर्म क्रमांक एक आणि दोन रिकामे करण्यात आले. (फोटो – पवन खेंग्रे)
-
खबरदारीचा उपाय म्हणून सर्वच प्लॅटफॉर्मवरील वाहतूक थांबवण्यात आली. (फोटो – पवन खेंग्रे)
-
बॉम्ब पथकाच्या सहाय्याने संपूर्ण रेल्वे स्थानक परिसरासाची तपासणी करायची की नाही, नेमकी ही वस्तू येथे आली कुठून यासंदर्भातील चर्चा वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये सुरु आहे. (फोटो – पवन खेंग्रे)
-
दरम्यान प्राथमिक शोध घेण्यासाठी डॉग स्क्वॉडला रेल्वे स्थानक परिसरात पाचारण करण्यात आलंय. (फोटो – पवन खेंग्रे)
-
सर्व प्रवाशांच्या सामानाची डॉग स्क्वॉडच्या मदतीने तपासणी करण्यात आलीय. (फोटो – पवन खेंग्रे)
-
ही वस्तू सापडल्यानंतर स्टेशन मास्तर, रेल्वेचे अधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांची पुणे रेल्वे स्थानकामधील कार्यालयामध्ये बैठक सुरु असल्याचीही माहिती समोर येत आहे. (फोटो – सागर कासार)
-
इतर राज्यांमध्ये जाणाऱ्या गाड्या उशीराने धावत आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. काही दिवसांपूर्वीच पुणे रेल्वे स्थानक परिसरामध्ये बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन आला होता. मात्र त्यानंतर तपासणी केली असता ही माहिती खोटी असल्याचं उघड झालेलं. त्यानंतर आज ही घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. (फोटो – पवन खेंग्रे)

५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ