-
मोदींच्या या भेटीमागे सर्वात महत्त्वाचा उद्देश हा भारत आणि नेपाळ संबंध अधिक वृद्धिंगत करणं हा होता. या दौऱ्यादरम्यान भारत आणि नेपाळदरम्यान सहा मेमोरेंडम ऑफ अंडरस्टँडिंग आणि करारपत्रांवर दोन्ही देशाच्या पंतप्रधानांनी स्वाक्षऱ्या केल्या.
-
सध्याच्या जागतिक परिस्थितीमध्ये भारत आणि नेपाळ यांच्यातील कधीही न संपणाऱ्या मैत्रीचा जगभरातल्या मानवतेला फायदा होईल, असा विश्वास मोदींनी ल्युम्बिनी इथे पार पडलेल्या इंटरनॅशनल बुद्धिस्ट कॉन्फरन्समध्ये बोलताना व्यक्त केला.
-
बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने मोदींनी सोमवारी नेपाळमधील मायादेवी मंदिरात प्रार्थना करून दर्शन घेतलं.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २०१४मध्ये बोधगया येथील बोधीवृक्षाचे एक रोपटे नेपाळमधील ल्युम्बिनी या ठिकाणी भेट दिले होते. त्या रोपट्याचा आता वृक्ष झाला असून या वृक्षाला यावेळी मोदी आणि नेपाळचे पंतप्रधान शेर बहादूर देओब यांनी बो पाणी दिलं.
-
यावेळी यावेळी मोदी आणि नेपाळचे पंतप्रधान शेर बहादूर देओब यांच्याहस्ते ल्युम्बिनी येथील इंटरनॅशनल बुद्धिस्ट कॉन्फेडरेशनच्या मालकीच्या असणाऱ्या जागेवर इंडिया इंटरनॅशनल सेंटर फॉर बुद्धिस्ट कल्चर अँड हेरिटेजच्या वास्तूचं शीलावरण करण्यात आलं.
-
इंडिया इंटरनॅशनल सेंटर फॉर बुद्धिस्ट कल्चर अँड हेरिटेजच्या माध्यमातून भारत आणि नेपाळ यांच्यातील सांस्कृतिक देवाण-घेवाणीसाठी मोलाचा हातभार लागाणार असल्याचं यावेळी सांगितलं गेलं.
-
भारत आणि नेपाळ यांच्यादरम्यान बौद्ध विचारसरणीचं मजबूत असं नातं निर्माण करण्यासाठी हे केंद्र काम करेल. भगवान बुद्धांची शिकवण आणि उच्च विचार देखील यातून अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवता येतील, असं देखील मोदी यावेळी म्हणाले.

