-
कोविड संसर्गापासून बचाव करण्यासाठी बूस्टर डोस घेतला जात आहे. कोविड लस लोकांना मृत्यू आणि गंभीर आजारांपासून वाचवण्यासाठी अत्यंत प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे.
-
दोन कोविड लस घेतल्यानंतर काही महिन्यांनी त्यांचा प्रभाव कमी होऊ लागतो. म्हणूनच जगभरातील डॉक्टर, आरोग्य तज्ज्ञ आणि सरकारांनी बूस्टर शॉट्स घेण्याचा सल्ला दिला आहे.
-
JAMA नेटवर्क ओपन अभ्यासात असे म्हटले आहे की, साइड इफेक्ट्स जरी असले तरी, ही लस आपल्या रोगप्रतिकारक प्रणालीवर काम करत असल्याचे सकारात्मक संकेत आहेत.
-
लस घेतल्यानंतर शरीरात अँटीबॉडीज तयार करते. त्यामुळे कोविड लढण्यास शरीर सज्ज होतं. पण काही साईड इफेक्टही जाणवू शकतात.
-
लसीचे दुष्परिणाम कमी करण्यासाठी, संतुलित आहार घ्या, हायड्रेटेड राहा आणि पुरेशी झोप घ्या. योग किंवा इतर शारीरिक क्रियाकलाप करा. बूस्टर डोसनंतर लोकांना धूम्रपान, मद्यपान आणि जंक फूडपासून दूर राहण्याचा सल्लाही डॉक्टरांनी दिला आहे.
-
लसीकरणानंतर वेदना किंवा कोणतीही अस्वस्थता वाटत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.
१९ डिसेंबर पंचांग: मार्गशीर्ष महिन्याच्या तिसऱ्या गुरुवारी लक्ष्मी ठोठावेल ‘या’ राशींचे दार; तुमच्या इच्छा आज पूर्ण होणार का? वाचा राशिभविष्य