-
सैराट चित्रपट कलाकार लंगड्या उर्फ तानाजी गलगुंडे, सल्या उर्फ अरबाज शेख यांनी यवतमाळमधील टिपेश्वर अभरण्य येथे जंगल सफारीला हजेरी लावून आनंद लुटला.
-
टिपेश्वरमधील आर्ची वाघिणीने सध्या सर्वांना भुरळ घातली आहे.
-
त्याच आर्चीला पाहायला सैराटचे कलाकार आले होते.
-
तानाजी गलगुंड आणि अरबाज शेख यांना आर्ची वाघिणीसह तिच्या ३ पिलांचे दर्शनही घडले.
-
तसेच विविध प्रकारचे प्राणी, पक्षी रोई, बंदर, हरीण, चितळे इत्यादींचे मनसोक्तपणे दर्शन झाल्याने दोघेही आनंदी दिसले.
-
यावेळी वनविभाग अधिकारी ACF आर. बी. कोंगावार, वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक येवतकर, एम. एच. २९ हेल्पिंग हँड्स टीमचे संस्थापक अध्यक्ष निलेश मेश्राम आणि गाईड सरफराज हेही उपस्थित होते.
-
यावेळी तानाजी गलगुंडेने जंगलातील रस्त्यावर बाईक चालवण्याचा आनंदही घेतला.
-
अभयारण्य सफारीनंतर तानाजी आणि अरबाज यांनी जंगलातील एका वाघिणीला आर्चीचं नाव ठेवलं तसं आता दोन वाघांना आमचीही नावं ठेवा म्हणत गंमत केली. यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
-
तानाजी आणि अरबाजने या जंगल सफारीविषयी बोलताना वनविभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून खूप मदत झाल्याचं बोलून दाखवलं.
-
तसेच आपल्या चाहत्यांनाही यवतमाळ जंगल सफारीचा आनंद घेण्याचं आवाहन केलं.
-
विशेष म्हणजे सैराट चित्रपटाची क्रेझ आजही कायम आहे. त्याचाच परिणाम म्हणून वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनाही या मराठी कलाकारांसोबत सेल्फी घेण्याचा मोह आवरता आला नाही.
-
तानाजी आणि अरबाज दोघांनी वनाधिकाऱ्यांच्या सहकार्याबद्दल तोंडभरून कौतुक केलं.

Champions Trophy: “हे फारच चुकीचं होतं…”, डेव्हिड मिलरने आफ्रिकेच्या पराभवाचं खापर ICCवर फोडलं, सामन्यानंतर दुबईला जाण्यावरून सुनावलं