-
देशाला लाभलेले अथांग सागरी क्षेत्र, या भागात मोठ्या प्रमाणात होत असलेली जलवाहतुक, सागरी भागात असलेली नैसर्गिक संपत्ती हे लक्षात या भागाच्या संरक्षणासाठी घेता P-8I विमानांचा समावेश नौदलात करण्यात आला
-
तंत्रज्ञान हे अमेरिकेचे असले तरी भारताच्या सोईनुसार बदल करत एकुण १२ P-8I टेहळणी विमानांचा नौदलात समावेश करण्यात आला आहे (फोटो सौजन्य – Indian Navy)
-
तामिळनाडूत INS Rajali आणि गोव्यात INS Hansa या नौदलाच्या हवाई तळांवर ही विमाने तैनात आहेत (फोटो सौजन्य – Indian Navy)
-
पाण्यावरील जहाजे, पाण्याखाली असलेल्या पाणबुड्या यांच्यावर नजर ठेवण्याची – शोध घेण्याची मुख्य जबाबदारी या विमानांवर आहे
-
अथांग समुद्रात गस्त घालण्याबरोबर जमिनीवरही टेहेळणीसाठी विमानांचा वापर होतो, डोकलाम प्रकरण आणि पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तान सीमेवरील हालचाल टिपण्यासाठी या विमानांचा वापर करण्यात आला होता
-
शक्तीशाली रडार, सर्वोत्कृष्ठ संदेशवहन यंत्रणा, वेळ पडल्यास क्षेपणास्त्र-पाणतीर (torpedo) डागण्याची या विमानात क्षमता आहे. सलग सहा तास गस्त घालण्याची, एका दमात ५ हजार किलोमीटरपेक्षा अंतर पार करण्याच्या P-8I च्या क्षमतेमुळे नौदलाचे सामर्थ्य वाढले आहे. (फोटो सौजन्य – wikipedia)
अभिनेत्री उर्मिला कोठारेच्या कारने दोन मजुरांना चिरडलं, एकाचा मृत्यू; घटनास्थळावरील व्हिडीओ आला समोर