-
देशातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यतीला आजपासून पिंपरी-चिंचवडमध्ये सुरुवात झाली आहे.
-
बैलगाडा मालकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाल्याने एक दिवस आधीच ही स्पर्धा सुरू करण्याची वेळ आयोजकांवर आली आहे.
-
तब्बल दीड कोटींची बक्षिसं असलेली ही स्पर्धा देशातील सर्वात मोठी असल्याचा दावा आयोजक करत आहेत.
-
चिखलीतील बैलगाडा घाट बैलगाडा मालक, शौकिनांनी फुलून गेला आहे.
-
जेसीबी, बोलेरो, ट्रॅक्टर आणि ११६ दुचाकी या स्पर्धेचे विशेष आकर्षण ठरत आहेत.
-
स्पर्धेत अव्वल कामगिरी करणाऱ्या बैलगाडा मालकांना ही बक्षीस दिली जाणार आहेत.
-
राज्याच्या कानाकोपऱ्यातून बैलगाडा मालक पिंपरी-चिंचवडमध्ये दाखल झालेत, गुरुवारी टोकन घेण्यासाठी बैलगाडा मालकांची अक्षरशः झुंबड उडाली होती.
-
या स्पर्धेसाठी अवघ्या तीन तासांच्या कालावधीत तब्बल दोन हजार टोकन गाडा मालकांना देण्यात आली आहेत.
-
यामुळं उद्यापासून म्हणजे २८ मे पासून सुरू होणारी ही स्पर्धा आजपासूनच घ्यावी लागली असून अनौपचारिक उदघाटन करण्यात आलं आहे. (फोटो सौजन्य: कृष्णा पांचाळ)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”