-
बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबीने (NCB) मुंबई क्रुज ड्रग्ज प्रकरणात क्लिन चीट दिली आहे.
-
आर्यन खानला क्लिन चीट मिळाल्यानंतर चाहत्यांनी शाहरुख खानच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेर एकच गर्दी केलेली पाहायला मिळाली.
-
‘एनसीबी’ने २ ऑक्टोबर २०२१ रोजी मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या कार्डेलिया क्रूझवर छापा टाकला होता.
-
यावेळी पाच ग्रॅम मेफ्रेडॉन (एमडी), १३ ग्रॅम कोकेन, २१ ग्रॅम चरस, एमडीएमएच्या २२ गोळ्या व एक लाख ३३ हजारांची रोकड जप्त करण्यात आली होती.
-
या प्रकरणी ‘एनसीबी’ने आर्यन खानसह आठ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.
-
आरोपींविरोधात अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
-
आर्यन खानला अटक करून चौकशी देखील करण्यात आली होती.
-
मात्र, चौकशीत ६ आरोपींविरोधात पुरावे मिळाले नसल्याचं एनसीबीने जारी केलेल्या प्रेस नोटमध्ये सांगितलं आहे.
-
त्यामुळे आरोपत्रातून आर्यन खानसह ६ जणांची नावे एनसीबीकडून वगळण्यात आली आहेत.
-
एनसीबीने दिलेल्या माहितीनुसार, आर्यन खानकडे ड्रग्ज सापडले नव्हते.
-
शाहरुखच्या ‘मन्नत’बाहेर आर्यन खानला पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी.
-
(सर्व फोटो : प्रदीप दास, इंडियन एक्सप्रेस)

Saudi Arabia Ban Visa : सौदी अरेबियाचा मोठा निर्णय; भारत, पाकिस्तानसह १४ देशांवर व्हिसा बंदी, कारण काय?