-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या घरासमोर हनुमान चालीसाचं वाचन करण्याच्या घोषणेमुळे खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे दाम्पत्य राज्यभर चर्चेचा विषय ठरले होते. (फोटो – धनंजय खेडकर)
-
या प्रकरणात त्यांना अटक देखील करण्यात आली होती. त्यानंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली असून आज ते अमरावतीमध्ये परतले आहेत. (फोटो – धनंजय खेडकर)
-
यावेळी नागपूर विमानतळावर नवनीत राणा आणि रवी राणा येणार म्हणून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी खासदार नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. (फोटो – धनंजय खेडकर)
-
३६ दिवसांनंतर जेव्हा आम्ही नागपूरमध्ये येतोय, मंदिरात दर्शन करण्यासाठी जात आहोत, तेव्हा इथे एवढी सेक्युरिटी ठेवली आहे. आम्हाला आतमध्ये थांबवून ठेवण्यात आलं होतं. देवाचा एवढा विरोध महाराष्ट्रात का आहे? असा सवाल नवनीत राणा यांनी केला. (फोटो – धनंजय खेडकर)
-
उद्धव ठाकरेंना दुसरं काम राहिलेलं नाही का? हा शनी लवकरात लवकर महाराष्ट्रातून दूर झाला पाहिजे यासाठी मी दररोज हनुमान चालीसा आणि आरती करेन, अशा शब्दांत त्यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. (फोटो – धनंजय खेडकर)
-
महाराष्ट्राचं संकट दूर व्हावं यासाठी सगळ्यांनी आराधना करायला हवी. महाराष्ट्राला लागलेला शनी लवकरात लवकर दूर व्हायला हवा, असं देखील त्या म्हणाल्या. (फोटो – धनंजय खेडकर)
-
आम्ही दिखाव्यासाठी करतो असं म्हणता. पण मुख्यमंत्री दिखाव्यासाठीही करत नाहीत. आपल्या मुख्यमंत्र्यांनी एकदा दिखाव्यासाठी का होईना, हनुमान चालीसा वाचावी, असं नवनीत राणा यावेळी म्हणाल्या. (फोटो – धनंजय खेडकर)
-
यासंदर्भात बोलताना रवी राणा यांनी देखील टीका केली. आम्ही जिथे जिथे पोहोचतो, तिथे मुख्यमंत्री पूर्ण ताकद लावतात. आम्हाला परवानगी नाकारणे, ताब्यात घेणे असे प्रकार सुरू आहेत. हा सगळा राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा अहंकार आहे, असं ते म्हणाले. (फोटो – धनंजय खेडकर)
-
राज्याची जनता हे पाहात आहे. हनुमानाचं नाव घेणाऱ्यांना जेलमध्ये टाकलं जातंय. मुख्यमंत्र्यांमध्ये आलेला हा अहंकार मोडून काढण्याचं काम राज्यातील हनुमान भक्त करतील, असं देखील ते म्हणाले. (फोटो – धनंजय खेडकर)
-
हे सगळं मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसारच होतंय. मुख्यमंत्र्यांकडून सत्तेचा दुरुपयोग होत आहे. संकटमोचक हनुमानला मी प्रार्थना करेन की त्यांना सद्बुद्धी मिळो. जय हनुमान, जय संविधान हेच महाराष्ट्राला वाचवू शकतं, अशा शब्दांत रवी राणा यांनी निशाणा साधला. (फोटो – धनंजय खेडकर)
-
यावेळी राणा दाम्पत्यानी नागपूरमध्ये मंदिरात हनुमान चालीसा पठण देखील केलं. अशाच प्रकारे पुढे अमरावतीमध्ये देखील त्यांनी हनुमान चालीसा पठण केलं. (फोटो – धनंजय खेडकर)
-
राज ठाकरेंनी मशिदींसमोर हनुमान चालीसा वाचण्याचा मुद्दा मांडल्यानंतर या मुद्द्यावरून जोरदार राजकारण सुरू झालं आहे. नवनीत राणा आणि रवी राणा यांनी राज ठाकरेंच्या आवाहनानंतरच हा मुद्दा उचलून त्यावरून आक्रमक भूमिका घ्यायला सुरुवात केल्याचं दिसून येत आहे. (फोटो – धनंजय खेडकर)

पिंपरी- चिंचवड: कुख्यात गुंडाकडून ईदच्या शुभेच्छा; महानगर पालिका, पोलिसांनी केली अशी कारवाई