-
जगतगुरु संत तुकाराम महाराज पालखी रथ ओढण्याचा मान यावर्षी वाकड येथील शेडगे कुटुंबाच्या बैलजोडीला मिळाला आहे. हिरा-राजा असं पालखी रथ ओढणाऱ्या बैलजोडीच नाव आहे.
-
अत्यंत रुबाबदार अशी बैलजोडी असून १७ बैलजोड्यांपैकी हिरा- राजा या जोडीची निवड देहू संस्थानने पालखी सोहळ्यासाठी केली आहे. याशिवाय, सागर टिळेकर यांच्या हिरा-मोतीचा देखील समावेश आहे.
-
जगतगुरु संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा २० जून पासून सुरू होत आहे. पालखी पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे.
-
पालखी रथ ओढण्यासाठी देहू संस्थानने बैलजोडी असलेल्या शेतकऱ्यांचे अर्ज मागविले होते.
-
यासाठी १७ अर्ज देहूसंस्थांकडे प्राप्त झाले, त्यापैकी ज्ञानेश्वर शेडगे यांच्या हिरा-राजाला यावर्षीचा मान मिळाला आहे. यामुळे शेडगे कुटूंबात आनंदाचे वातावरण आहे
-
ज्ञानेश्वर शेडगे हे वारकरी संप्रदायातील असून गेल्या काही वर्षांपासून ते देहू ते पंढरपूर वारी करतात.
-
जगतगुरु संत तुकाराम महाराज यांचा पालखी रथ ओढण्याचा मान बैलजोडीला मिळावा म्हणून शेडगे कुटंबिय तब्बल नऊ बैलांचा सांभाळ करत आहेत.
-
त्यापैकी यावर्षी हिरा-राजा या जोडीला मान मिळाला आहे, असे गिरीश ज्ञानेश्वर शेडगे यांनी सांगितलं आहे.
-
देहू संस्थानचे विश्वास्थ नितीन महाराज मोरे यांनी स्वतः बैल जोडीची पाहणी केली. त्यानंतर या दोन्ही बैलांची निवड एकमताने करण्यात आली.
-
हिरा-राजा या बैलजोडीला सात वर्षांपूर्वी कर्नाटकमधून आणण्यात आलं होते.
-
त्यांचं संगोपन करून दररोज खुराख खायला दिला जात आहे. याच पद्धतीने ऐकून नऊ बैलांचा सांभाळ शेडगे कुटुंब करत आहे.
-
दरम्यान, दीड वर्षांपूर्वी एका बैलाचा मृत्यू झाल्याचे सांगत असताना ज्ञानेश्वर शेडगे यांना अश्रू अनावर झाले. (सर्व फोटो – कृष्णा पांचाळ/ लोकसत्ता प्रतिनिधी)

Pune Bus Rape Case : पुणे बलात्कार प्रकरणातील आरोपी गाडेचा भाऊदेखील पोलिसांच्या ताब्यात; वकीलाने सांगितलं कारण