-
प्रदूषणमुक्त प्रवास आणि इंधनावरील खर्च कमी करण्यासाठी एसटी महामंडळाची विजेवर धावणारी पहिली वातानुकूलित ‘शिवाई’ बस १ जूनपासून प्रवाशांच्या सेवेत दाखल होत आहे.
-
पहिली बस पुणे-अहमदनगर मार्गावर धावणार आहे.
-
या गाडीचे भाडे २७० रुपये असल्याची माहिती एसटी महामंडळातील अधिकाऱ्यांनी दिली.
-
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ‘शिवाई’चा लोकार्पण सोहळा पुणे येथे पार पडला आहे.
-
पुणे-अहमदनगर-पुणे मार्गावर धावणाऱ्या एसटीच्या ‘शिवाई’च्या दिवसाला सहा फेऱ्या होतील.
-
एका कंपनीकडून प्रथम ५० ‘शिवाई’ बस घेण्यात येतील.
-
त्यानंतर आणखी १०० ‘शिवाई’ बस येत्या ऑगस्टपर्यंत ताफ्यात समाविष्ट होतील.
-
५० पैकी दहा बस पुणे-अहमदनगरबरोबरच पुणे ते औरंगाबाद मार्गावर चालवण्याचे नियोजन आहे.
-
याशिवाय १२ बस पुणे-कोल्हापूर, १८ बस पुणे-नाशिक, १० बस पुणे-सोलापूर मार्गावर चालवण्यात येतील.
-
एका चार्जिगमध्ये २५० किलोमीटपर्यंत धावण्याची या बसची क्षमता आहे.
-
या बसची लांबी १२ मीटर असून टू बाय टू आसन व्यवस्था आहे.
-
बसमध्ये एकूण ४३ आसने असल्याची माहिती एसटी महामंडळाने दिली. (फोटो – अरुल होरायझन, इंडियन एक्सप्रेस)

भाऊ कदम स्वत:च्या मुलींच्या लग्नात जाणार नाही? भावुक होत म्हणाले, “त्यांच्या लग्नाच्या विचाराने…”