-
पुणे-मुंबई दरम्यान रेल्वेने दररोजचा प्रवास करणाऱ्या नोकरदार आणि व्यावसायिकांची लाडकी ‘डेक्कन क्वीन’ला आज ९३ वर्षे पूर्ण होत आहेत.
-
‘डेक्कन क्वीन’ ही दख्खनची राणी म्हणूनही प्रसिद्ध आहे.
-
आज केक कापून उत्साहात ‘डेक्कन क्वीन’चा वाढदिवस साजरा करण्यात आला.
-
गाडीच्या इंजिनला हार व फुलांनी सजविण्यात आले होते.
-
केक कापून प्रवाशांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या.
-
खंडाळ्याच्या घाटातली निसर्गशोभा दाखवत पुणेकरांना दर सकाळी मुंबईकडे नेणारी ‘डेक्कन क्वीन’.
-
१ जून १९३० रोजी सुरू झालेला ‘डेक्कन क्वीन’चा प्रवास आजही अव्याहतपणे सुरू असून मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांची ती आजही पहिली पसंती आहे.
-
या गाडीची लिम्का बुकमध्येही नोंद झाली आहे.
-
त्याचप्रमाणे तिला ‘आयएसओ’ हे गुणवत्तेचे प्रमाणपत्रही मिळाले आहे.
-
दरवर्षी १ जूनला या गाडीचा वाढदिवस उत्साहाने साजरा करण्यात येतो.
-
आपल्या घरातील कार्यक्रम असल्याप्रमाणे प्रवासी या कार्यक्रमात सहभाग घेतात.
-
(फोटो – आशिष काळे, इंडियन एक्सप्रेस)

Devendra Fadnavis : ‘मी शिंदेंना सांगणार, कडक समज द्या, अन्यथा…’, संजय गायकवाड यांच्या वक्तव्यावरून फडणवीसांचा मोठा इशारा