-
मुंबईतील चिंचपोकळी येथे ‘ऑस्ट्रेलियाचा राजा’ या २१ फुटांच्या गणपती मूर्तीचे अनावरण करण्यात आले.
-
ही मूर्ती १७ जून रोजी समुद्री मार्गाने ऑस्ट्रेलियाला नेण्यात येणार आहे.
-
मूर्तिकार मनोहर बागवे यांनी ही सुंदर मूर्ती साकारली आहे.
-
आकर्षक रंगसंगती आणि देखणी मूर्ती हे बागवे आर्ट्स यांच्या गणेशमूर्तीचे वैशिष्ट्य आहे.
-
प्रथम दर्शन सोहळा ढोल-ताशाच्या गजरात संपन्न झाला.
-
गेल्या दोन वर्षांपासून करोनामुळे सर्वच सण अगदी साध्या पद्धतीने पार पडले.
-
करोनाचा सर्वात मोठा फटका हा मुंबईतील गणेशोत्सवाला बसला आहे.
-
मात्र यंदा गणेशोत्सव थाटामाटात होईल, अशी अपेक्षा मुंबईतील मूर्तिकार व्यक्त करत आहेत.
-
३१ ऑगस्टपासून गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे.
-
आपल्या लाडक्या बाप्पाची भाविक आतुरतेने वाट पाहत आहेत.
-
बाप्पाच्या आगमानाची जय्यत तयारीही अनेक ठिकाणी सुरु झाली आहे.
-
(फोटो – अमित चक्रवर्ती, इंडियन एक्सप्रेस)

मुंबईतल्या अंधेरी स्टेशनवर कपल झालं बेभान; रोमान्स करताना अक्षरश: हद्दच पार केली, लाजीरवाणा VIDEO होतोय व्हायरल