-
जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी (१४ जून) श्रीक्षेत्र देहू येथे आले आहेत.
-
आषाढी वारीसाठी सोमवारी (२० जून) तुकोबांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान होणार असून, त्यापूर्वी लोकार्पणाचा सोहळा होत असल्याने वारकऱ्यांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वायुसेनेच्या हेलिकॉप्टरने पुणे विमानतळावर आगमन झाले.
-
त्यांच्या स्वागतासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, खासदार गिरीश बापट, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख तसेच इतर नेते उपस्थित होते.
-
२० मिनिटांच्या या लोकार्पण सोहळ्यानंतर त्यांनी सभेला संबोधित केले.
-
“शास्त्रात सांगितलं आहे की संतांची अनुभूती झाली तर देवाची अनुभूती होते. देहूत येऊन याची प्रचिती आली आहे. तुकाराम महाराजांचे जन्मस्थळ आणि कर्मभूमी आहे देहू. देहूत पांडुरंगाचा नित्य निवास आहे”, असं मोदी म्हणाले.
-
नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याची केंद्रीय तसेच राज्यस्तरीय पथकाकडून सुरक्षिततेच्या सर्व बाबींची कसून तपासणी करण्यात आली आहे.
-
मंदिर परिसरात मोठा सभामंडप उभारण्यात आला आहे.
-
समारंभात संत तुकाराम पगडीने पंतप्रधानांचे स्वागत करण्यात आले.
-
पंतप्रधान मोदी हे दोन तास देहू परिसरात असणार आहेत.
-
पंतप्रधान मोदी हे मंगळवारी मुंबईत दोन कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत.
-
देहू येथील कार्यक्रम पार पडल्यावर पंतप्रधान मुंबईत दाखल होतील.
-
दुपारी त्यांच्या हस्ते राजभवनमध्ये ‘जल भूषण’ या नव्याने उभारण्यात आलेल्या राज्यपालांच्या निवासस्थानाची इमारत आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या दालनाचे उदघाटन मोदी यांच्या हस्ते होईल.
-
त्यानंतर ‘मुंबई समाचार’ या गुजराती दैनिकाला २०० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या समारंभाला मोदी हे उपस्थित राहतील.
-
(सर्व फोटो सौजन्य : ट्विटर)

५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ