-
आज २१ जून रोजी ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ साजरा होत आहे. (फोटो – नरेंद्र वास्कर, इंडियन एक्सप्रेस)
-
देशभरातही सर्वच राज्ये सकाळपासून योगमय झाली आहेत. (फोटो – आशिष काळे, इंडियन एक्सप्रेस)
-
शारीरिक व मानसिक अनारोग्याचे निवारण व्हावे यासाठी नियमित योगासने करणे गरजेचे आहे, असा सल्ला अनेक योगाभ्यासक देतात. (फोटो – आशिष काळे, इंडियन एक्सप्रेस)
-
रोग निवारणाच्या या पद्धतीला २०१४ सालापासून आंतरराष्ट्रीय मान्यताही मिळालेली आहे. (फोटो – नरेंद्र वास्कर, इंडियन एक्सप्रेस)
-
२०१५ मध्ये २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून घोषणा करण्यात आली. (फोटो – नरेंद्र वास्कर, इंडियन एक्सप्रेस)
-
त्यानंतर आज आठवा योग दिवस साजरा होत आहे. (फोटो – आशिष काळे, इंडियन एक्सप्रेस)
-
योग हा भारताच्या प्राचीन परंपरेचा एक भाग आहे. (फोटो – आशिष काळे, इंडियन एक्सप्रेस)
-
मरिन ड्राइव्हपासून ते उपनगरांमधील सोसायट्यांमध्ये योग दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. (फोटो – नरेंद्र वास्कर, इंडियन एक्सप्रेस)
-
२१ जून रोजीचा दिवस जगभरातील अनेक देशांमध्ये सर्वात मोठा दिवस असतो. (फोटो – आशिष काळे, इंडियन एक्सप्रेस)
-
त्यामुळे २१ जूनला विशेष महत्त्व आहे. (फोटो – आशिष काळे, इंडियन एक्सप्रेस)
-
म्हणून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ म्हणून साजरा करण्यात यावा, असा प्रस्ताव मांडण्यात आला. (फोटो – आशिष काळे, इंडियन एक्सप्रेस)
-
योग दिनानिमित्त केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी वेगवेगळी योगासन केली. (फोटो – राजेश स्टीफन, इंडियन एक्सप्रेस)
-
भारतातील ५००० वर्ष जुनी शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक साधना असून, ती शरीर व मनात परिवर्तन घडवून आणते. (फोटो – आशिष काळे, इंडियन एक्सप्रेस)
-
वैद्यकीय क्षेत्रात केलेल्या सर्व संशोधनाच्या आधारे हे देखील सिद्ध झाले आहे की नियमितपणे योग केल्यास शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या चांगले आरोग्य मिळते. (फोटो – आशिष काळे, इंडियन एक्सप्रेस)
-
राज्यभरात विविध भागांत योगादिनानिमित्त कार्यक्रम साजरे करण्यात आले आहेत. (फोटो – राजेश स्टीफन, इंडियन एक्सप्रेस)
-
योगाकडे शास्त्र म्हणून पाहण्याचा आणि त्याचा वापर आपल्या आरोग्यासाठी करून घेण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. (फोटो – आशिष काळे, इंडियन एक्सप्रेस)
-
योगसाधना केवळ शरीराचा व्यायाम नसून, मनुष्याच्या आंतरिक विकासासाठी योगसाधना आवश्यक आहे. (फोटो – नरेंद्र वास्कर, इंडियन एक्सप्रेस)
-
दिवसातील १० ते १५ मिनिटं योगासने केल्याने अनेक अडचणींवर मात मिळवता येईल. (फोटो – नरेंद्र वास्कर, इंडियन एक्सप्रेस)

Crime News : १७ वर्षीय बलात्कार पीडितेवर पोलिसाने पुन्हा केला बलात्कार, खाकी वर्दीला लाज आणणारी घटना कुठे घडली?