-
अलंकापुरी आळंदीत संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा पार पडत आहे.
-
करोनानंतर पहिल्यांदाच वारकऱ्यांच्या उपस्थितीत सोहळा होत आहे.
-
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो वारकरी आळंदीत दाखल झालेत.
-
इंद्रायणी काठी वैष्णवांची मांदियाळी पाहायला मिळत आहे.
-
ज्ञानोबा माऊली तुकाराम चा जयघोष वारकरी करत आहेत.
-
हातात भगवी पताका घेऊन टाळ, मृदंगाच्या गजरात वारकरी तल्लीन झाला आहे.
-
लहानापासून वयोवृद्ध या पालखी सोहळ्यात सहभागी झाले आहेत.
-
गेली दोन वर्ष करोनामुळे पालखी सोहळा हे मोजक्याच वारकऱ्यांच्या उपस्थित पार पडले होते.
-
यावर्षी करोनाचे निर्बंध नसल्याने आळंदीत वारकरी मोठ्या प्रमाणावर दाखल झालेत. (सर्व छायाचित्रे – प्रतिनिधी कृष्णा पांचाळ)

‘या’ तारखेला जन्मलेल्या लोकांना आयुष्यात खूप उशीरा मिळतो पैसा, धन-संपत्ती; वयानुसार सुधारते आर्थिक परिस्थिती