-
महाराष्ट्रात सध्या राजकीय उलथापालथ सुरू आहे. (फोटो : दीपक जोशी, इंडियन एक्सप्रेस)
-
शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार संकटात आले आहे.(फोटो : ANI)
-
२२ जून रोजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधताना सांगितल्याप्रमाणे रात्रीच मातोश्रीची वाट धरली. (फोटो : ANI)
-
उद्धव ठाकरे यांनी ‘वर्षा’ या मुख्यमंत्री निवासस्थानावरून मातोश्रीवर मुक्काम हलवला. (फोटो : ANI)
-
मुख्यमंत्रीपदी असताना वर्षा हे शासकीय निवासस्थान सोडणारे ठाकरे हे पहिलेच मुख्यमंत्री ठरले आहेत. (फोटो : ANI)
-
मुख्यमंत्र्यांना निरोप देण्यासाठी ‘वर्षा’पासून ते वांद्रयापर्यंत ठिकठिकाणी शिवसैनिकांनी हजारोंच्या संख्येने गर्दी करत शक्तिप्रदर्शन केले.
-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे वर्षा निवासस्थानातून बाहेर पडले तेव्हा त्यांच्यावर फुलांची उधळण करण्यात आली. (फोटो : ANI)
-
यावेळी शिवसैनिकांकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली. (फोटो : दीपक जोशी, इंडियन एक्सप्रेस)
-
“शिवसेनेचे आमदार गेले असले तरी असे आमदार पुन्हा निवडून आणण्याची शिवसेनेची ताकद आहे.”, असा विश्वास शिवसैनिकांनी दाखविला. (फोटो : दीपक जोशी, इंडियन एक्सप्रेस)
-
तसेच एकनाथ शिंदे व त्यांच्यासोबतचे आमदार हे हिंदुत्वासाठी नव्हे तर ईडीची कारवाई टाळण्यासाठी भाजपबरोबर गेले आहेत, अशा भावना शिवसैनिक माध्यमांशी बोलताना व्यक्त करत होते.(फोटो : दीपक जोशी, इंडियन एक्सप्रेस)
-
शिवसैनिकांच्या गर्दीमुळे वर्षा ते मातोश्री हे अंतर गाठण्याकरिता ठाकरे यांच्या गाड्यांच्या ताफ्याला सुमारे सव्वा तास लागला.(फोटो : ANI)
-
मोठ्या संख्येवर जमलेल्या शिवसैनिकांना मुख्यमंत्र्यांनी गाडीतून उतरून अभिवादन केले. (फोटो : इंडियन एक्सप्रेस)
-
तर आदित्य ठाकरेंनी वज्रमूठ दाखवत लढण्याचा निर्धार व्यक्त केला.(फोटो : ANI)
-
शिवसैनिकांची गर्दी पाहून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे भावूक झाल्या होत्या. (फोटो : ANI)
-
(फोटो : दीपक जोशी, इंडियन एक्सप्रेस)
![Jasprit Bumrah Ruled Out of Champions Trophy 2025 Due to Lower Back Injury](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/Jasprit-Bumrah-Ruled-out-of-Champions-Trophy.jpg?w=300&h=200&crop=1)
Champions Trophy: जसप्रीत बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर, भारताला मोठा धक्का; BCCIने बदली खेळाडूची केली घोषणा