-
शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार संकटात आहे.
-
विधान परिषद निवडणुकीनंतर नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही आमदारांसह सुरतची वाट धरली.
-
त्यानंतर आमदारांसहित त्यांनी आपला मुक्काम थेट गुवाहाटीला हलवला.
-
गुवाहाटीतील ‘रेडिसन ब्लू हॉटेल’मध्ये एकनाथ शिंदे शिवसेनेच्या ३७ आणि ९ अपक्ष आमदारांसहित थांबले असल्याची माहिती आहे.
-
या हॉटेलमधील एकनाथ शिंदे आणि समर्थकांचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
-
फोटोमध्ये एकनाथ शिंदे यांच्यासोबत ४२ आमदार दिसत आहेत.
-
एकनाथ शिंदे आमदारांचे नेतृत्व करतानाचा फोटोही समोर आला आहे.
-
एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेले आमदार.
-
एकनाथ शिंदे आणि आमदारांचे हे शक्तिप्रदर्शनाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
![What Eknath Shinde Said?](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/ES-SP-1.jpg?w=300&h=200&crop=1)
Eknath Shinde : एकनाथ शिंदेंचं विधान, “शरद पवारांची गुगली भल्याभल्यांना कळत नाही, त्यांनी मला…”