-
करोना संकटाच्या दोन वर्षांच्या कालखंडा नंतर माऊलींच्या सोबतीने विठुरायाच्या भेटीला जाण्याची रुखरुख संपली.
-
संकटाची वर्ष सरल्यानंतर आता अलंकापुरीत आलेला वैष्णवांचा मेळा माउलींच्या सावलीत पंढरीच्या वाटेवर निघाला.
-
श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्यांचे शुक्रवारी (२४ जून) सकाळी मार्गक्रमण होणार आहे.
-
पालखी सोहळ्यात मोठ्या संख्येने राज्याच्या वेगवेगळ्या भागातून वारकरी सहभागी होतात.
-
टाळ आणि मृदुंगाच्या गजरात विठूनामाचाजयघोष करीत शंभर वारकऱ्यांना गुरुवारी मेट्रोची सफर घडवून आणण्यात आली.
-
नवयुग मित्र मंडळ ट्रस्ट आणि सारथी कट्टा यांच्यावतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
-
टाळ-मृदुंगाचा निनाद आणि हरिनामाचा गजर मेट्रोत झाला.
-
मेट्रोत जणू भक्तीरसाचा मळा फुलून आला.
-
उत्साहाने भारलेल्या वारकऱ्यांनी देहभान हरपून ‘माऊली, माऊली…’ चा अखंड अखंड घोष करीत चैतन्य भरले आणि भक्तीकल्लोळाला जणू उधाणच आले.
-
रविवार, १० जुलै रोजी आषाढी एकादशी आहे.
-
महाराष्ट्राला वारीची परंपरा लाभली आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, संतशिरोमणी तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज, संत नामदेव, निळोबाराय, नरहरी महाराज, सेना महाराज, सावता माळी, चोखोबा अशी भागवत संप्रदायातील संतांची मालिका आहे.
-
(सर्व फोटो – अरुल होरायझन, इंडियन एक्सप्रेस)

‘या’ तारखेला जन्मलेल्या लोकांना आयुष्यात खूप उशीरा मिळतो पैसा, धन-संपत्ती; वयानुसार सुधारते आर्थिक परिस्थिती