-
महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या खंडेरायाच्या जेजुरीत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी सोहळ्याचे आगमन होताच पिवळ्याधमक भंडाऱ्याची मुक्त उधळण करण्यात आली.
-
भक्तिचैतन्याची ही वारी मल्हारीच्या दारी आल्यामुळे वैष्णांची मनेही आनंदून गेली.
-
यामुळे माउलींच्या पालखी रथाला सोनेरी झळाळी आली.
-
विठ्ठलाच्या नामघोषाबरोबरच वारकरी बांधवांनी ‘येळकोट येळकोट जय मल्हार’ असा जय घोष केल्याने सारे वातावरण भक्तिमय झाले.
-
लांबूनच खंडोबा गड पाहताच वारकऱ्यांमध्ये चैतन्य संचारले.
-
टाळ-मृदुंगाच्या गजरात खंडोबाची पारंपरिक गाणी दिंड्यातून ऐकू येऊ लागली.
-
भक्तिचैतन्याची वारी, आली मल्हारीच्या दारी वैष्णवांची मने आनंदली, माउली भंडाऱ्यात न्हाली…
-
पालखीच्या स्वागताला उधळण केलेल्या भंडाऱ्याने पालखी रथाला सोनेरी झळाळी आली अन् माउली भंडाऱ्यात न्हाली.
-
खंडोबा देव अठरापगड जातींचं दैवत आहे. त्याला शंकराचा अवतार मानतात.
-
खंडोबा व पंढरीचा विठोबा या दोन्ही दैवतांच्या भक्तिरसात सारे जण न्हाऊन निघाले.
-
सारी जेजुरीनगरी वारकरी बांधवांचे आदरातिथ्य व सेवा करण्यात गुंतली होती.
-
जेजुरीतील कडेपठार पायथा, चिंचेची बाग, छत्री मंदिर, लवथळेश्वर, औद्योगिक वसाहत आदी ठिकाणी तंबू उभारून वारकरी दिंड्या उतरल्या होत्या.
-
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी सोहळ्याबरोबर आलेल्या हजारो वारकरी बांधवांनी खंडोबा गडावर दर्शनासाठी प्रचंड गर्दी केली होती.
-
पहाटेपासून खंडोबाच्या दर्शनासाठी मोठी रांग लागली होती.
-
(सर्व फोटो – पवन खेंगरे, इंडियन एक्सप्रेस)

५ मार्च राशिभविष्य: कृतिका नक्षत्रात १२ राशींच्या काम, खर्च व प्रेमाची स्थिती कशी असणार? पंचांगानुसार तुमच्या राशीचे भाग्य कसे उजळणार?