-
यंदा १० जून रविवारी आषाढी एकादशी आहे. दोन वर्षांनंतर पुन्हा एकदा त्याच जल्लोषात वारी होत असल्यामुळे वारकरी आनंदात आहेत.
-
दरवर्षी पंढरपुरातील पांडुरंगाची पूजा करण्याचा मान राज्याच्या मुख्यमंत्र्यांना दिला जातो.
-
यावर्षी राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आषाढी एकादशीला विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात पूजा केली जाणार आहे.
-
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या सदस्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी जाऊन आषाढी एकादशीच्या मंगलदिनी पांडुरंगाच्या महापूजेसाठी सहकुटुंब सहपरिवार येण्यासाठी त्यांना आमंत्रित केले.
-
यावेळी वारकरी फेटा, उपरणे, वीणा आणि पांडुरंगाची तसबीर देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
-
“पूजेसाठी नक्की उपस्थित राहू आणि पंढरपूर मंदिर समितीला लागेल ती मदत करू”, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी समितीच्या सदस्यांना आश्वस्त केले.
-
याप्रसंगी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सह-अध्यक्ष ह.भ.प.श्री.गहिनीनाथ महाराज औसेकर, पंढरपूर प्रांत अधिकारी आणि मंदिर समिती कार्यकारी अधिकारी श्री.गजानन गुरव तसेच मंदिर समिती सदस्य उपस्थित होते.
-
(सर्व फोटो : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे/ इन्स्टाग्राम)
Aditya Thackeray: “सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का?”, मराठी सणांचा उल्लेख करत आदित्य ठाकरेंची टीका