-
गेल्या दोन दिवसांपासून मुंबई आणि उपनगरांत मुसळधार पाऊस कोसळत असून मुंबईतील विविध ठिकाणचे सखलभाग जलमय झाल्याने नागरिकांचे अतोनात हाल झाले. (फोटो – अमित चक्रवर्ती, इंडियन एक्सप्रेस)
-
मुंबई आणि उपनगरांत झालेल्या अतिमुसळधार सरींची नोंद वेगवेगळ्या भागात १४० ते १५० मिमी झाली. (फोटो – नरेंद्र वास्कर, इंडियन एक्सप्रेस)
-
उसंत न घेता सलग दुसऱ्या दिवशी कोसळणाऱ्या पावसाने मुंबईतील अनेक भाग जलमय झाले. (फोटो – अमित चक्रवर्ती, इंडियन एक्सप्रेस)
-
त्यामुळे अनेक रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली तर लोकल रेल्वे सुरू असली तरी वेळापत्रक कोलमडले होते. (फोटो – अमित चक्रवर्ती, इंडियन एक्सप्रेस)
-
दरम्यान, पुढील दोन दिवस मुंबई आणि ठाण्यात पाऊस कायम राहणार आहे. (फोटो – गणेश शिर्सेकर, इंडियन एक्सप्रेस)
-
शहर आणि उपनगरांमध्ये सोमवारपासून अतिमुसळधार पावसाने हजेरी लावली. (फोटो – गणेश शिर्सेकर, इंडियन एक्सप्रेस)
-
मुंबई शहर आणि उपनगरांतील वेगवेगळ्या भागांत मंगळवारी सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत, २४ तासांत १४० ते १५० मिमी पाऊस पडला. (फोटो – अमित चक्रवर्ती, इंडियन एक्सप्रेस)
-
मुंबई आणि ठाण्यातही जनजीवन विस्कळीत झाले आहे. (फोटो – अमित चक्रवर्ती, इंडियन एक्सप्रेस)
-
पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा आदी भागांत जोरदार पाऊस होत आहे. (फोटो – प्रदीप दास, इंडियन एक्सप्रेस)
-
विदर्भातही गेल्या चोवीस तासांत काही भागांत जोरदार सरी कोसळल्या. (फोटो – अमित चक्रवर्ती, इंडियन एक्सप्रेस)
-
मराठवाड्यात मात्र पावसाचे प्रमाण अद्यापही कमी आहे. (फोटो – गणेश शिर्सेकर, इंडियन एक्सप्रेस)
-
अरबी समुद्रातून सध्या महाराष्ट्राच्या दिशेने मोठ्या प्रमाणावर बाष्प येत आहे. (फोटो – अमित चक्रवर्ती, इंडियन एक्सप्रेस)
-
त्यामुळे कोकण किनारपट्टीचा भाग आणि त्यालगत थेट पश्चिम महाराष्ट्रापर्यंत मोठ्या प्रमाणातवर ढग निर्माण होत असल्याने दोन ते तीन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. (फोटो – अमित चक्रवर्ती, इंडियन एक्सप्रेस)
-
पुढील पाच दिवस मुंबईला सतर्कतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला असून मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. (फोटो – गणेश शिर्सेकर, इंडियन एक्सप्रेस)
-
गेल्या काही दिवसांपासून रिमझिम पाऊस पडत होता. मात्र, सोमवारी सायंकाळपासून पावसाने जोर धरला. (फोटो – अमित चक्रवर्ती, इंडियन एक्सप्रेस)
-
मंगळवारी सकाळपासून मुसळधार पाऊस पडत होता. (फोटो – गणेश शिर्सेकर, इंडियन एक्सप्रेस)
-
त्यामुळे विक्रोळी, वांद्रे, दादर, हिंदमाता, शीव, भायखळा, परळ, बोरिवली, कांदिवली, अंधेरी भुयारी मार्ग, टिळक नगर टर्मिनस, टेम्बी पूल परिसर, कुर्ला येथील शेख मेस्त्री दर्गा, नेहरूनगर या भागात पाणी साचले. (फोटो – अमित चक्रवर्ती, इंडियन एक्सप्रेस)
-
परिणामी, या भागांतील काही रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आणि वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात आली. (फोटो – प्रदीप दास, इंडियन एक्सप्रेस)
-
वाहतूक कोंडीचा फटका वाहनचालकांना सोसावा लागला. (फोटो – प्रदीप दास, इंडियन एक्सप्रेस)
-
चिखलमय झालेल्या रस्त्यांवरून वाहने चालविण्यासाठी चालकांना मोठी कसरत करावी लागत होती. (फोटो – अमित चक्रवर्ती, इंडियन एक्सप्रेस)
-
सकाळपासून पाऊस पडल्याने लालबाग, परळसह अन्य भागांतील भागातील बाजारपेठांमध्ये तुरळक रहदारी होती. (फोटो – अमित चक्रवर्ती, इंडियन एक्सप्रेस)
-
(हेही पाहा : डोक्यावर पाऊस अन् डोळ्यात पाणी…; मुख्यमंत्री शिंदेंची आंबेडकर, बाळासाहेब, दिघे स्मृतीस्थळाला भेट) (फोटो – नरेंद्र वास्कर, इंडियन एक्सप्रेस)
५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ