-
गुजरातमध्ये मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. राज्यातील अहमदाबाद, वलसाड, नडियादसह अनेक मोठ्या शहरांमध्ये मुसळधार पावसामुळे पाणी साचलंय.
-
खेडा जिल्ह्यात पावसामुळे घरं पाण्याखाली गेली आहेत.
-
अनेक शहरांमध्ये रस्ते पाण्याखाली गेल्याने नागरिक घरात अडकून पडले आहेत.
-
वलसाडमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यातील ३८८ रोड पावसामुळे बंद झाले आहेत.
-
छोटा उदयपूर जिल्ह्यालाही मुसळधार पावसाने झोडपून काढले.
-
इथे पावसामुळे नदीचा प्रवाह वाढला. त्यामुळे पूल वाहून गेला तसेच पुलाच्या रेलिंगचंही मोठं नुकसान झालंय.
-
अनेक गावांचा शेजारच्या गावांशी संपर्क तुटला आहे.
-
छोटा उदयपूर जिल्ह्यात पावसामुळे पाण्याचा प्रवाह वाढून रस्ता वाहून गेला.
-
नडियाद शहरालाही या मुसळधार पावसाचा फटका बसला. शहरातील मुख्य रस्त्यांवर पाणी साचलंय.
-
राज्यभरात पुरात अडकलेल्या तीन हजार नागरिकांना एसडीआरएफ आणि एनडीआरएफने आतापर्यंत सुरक्षित स्थळी हलवलं आहे.
-
छोटा उदेपूर, डांग, नर्मदा, वलसाड, नवसारी आणि पंचमहाल या सहा जिल्ह्यांत रविवारी सकाळी ८ ते सायंकाळी ६ या वेळेत पाच इंच पावसाची नोंद झाली.
-
एनडीआरएफच्या सहाव्या बटालियनने एक निवेदन जारी करत त्यांची टीम १२ जिल्ह्यांमध्ये तैनात करण्यात आली आहे, अशी माहिती दिली.
-
नवसारी, गीर सोमनाथ, सुरत, राजकोट, बनासकांठा, वलसाड, भावनगर, कच्छ, जामनगर, अमरेली, द्वारका आणि जुनागढ या जिल्ह्यांना पावसाचा मोठा फटका बसलाय.
-
“गुजरातमध्ये पुढील दोन दिवस मुसळधार पावसाच्या अंदाजाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी सर्व सहा जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना सतर्क राहण्यास सांगितले आहे.
-
वलसाडमध्ये पुरात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यात आलं.
-
अहमदाबादमध्ये रस्त्यांवर कंबरेपर्यंत पाणी साचल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतोय. पुढचे तीन दिवस राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे पूरग्रस्त भागातील शाळा कॉलेज बंद ठेवण्यात आले आहेत.
-
(सर्व फोटो एएनआय आणि पीटीआयवरून साभार)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”