-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोमवारी नांदेड आणि हिंगोली दौऱ्यावर होते.
-
श्रावण महिन्यातील दुसऱ्या सोमवारी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या श्री क्षेत्र औंढा नागनाथ मंदिरात उपस्थित राहून भगवान शिवशंकराची पूजा केली.
-
शंकराच्या पिंडीला जलाभिषेक करत “राज्यातील जनतेला सुखी समाधानी ठेव. यंदाच्या वर्षी बळीराजाला उत्तम पीक पाणी मिळू दे” असे साकडे भोलेनाथाला घातले.
-
हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय बांगर यांच्या पुढाकाराने ‘कावड यात्रा’ आयोजित करण्यात आली होती.
-
या यात्रेत भगवा झेंडा आणि त्रिशूळ घेऊन हजारो शिवभक्त आणि शिवसैनिक सहभागी झाले होते.
-
यावेळी शिंदे यांनी आपल्या समर्थक आमदारांसह शक्तीप्रदर्शन केले.
-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही कावड यात्रेत सहभागी होत भगवान शंकराचा जयघोष केला.
-
याप्रसंगी हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार हेमंत पाटील, आमदार बांगर, आमदार संजय राठोड, आमदार बालाजी कल्याणकर तसेच हजारोंच्या संख्येने हिंगोलीकर शिवभक्त उपस्थित होते.
-
यावेळी केलेल्या भाषणात मुख्यमंत्री शिंदेंनी नीति आयोगाच्या बैठकीबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उल्लेख करत केंद्र आणि राज्य सरकार हे डबल इंजिनचं सरकार राज्याला विकासाच्या मार्गावर नेईल असा विश्वास व्यक्त केला.
-
“देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, या राज्याला पुढे घेऊन जा. या राज्याची प्रगती करा. या राज्याला विकासाच्या दिशेने घेऊन जा,” असंही मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितलं.
-
तसेच “पंतप्रधान मोदींनी तुम्हाला कसलीच कमी पडू देणार नाही. केंद्र सरकार तुमच्या राज्याच्या पाठीशी पूर्ण ताकदीने उभं असेल असंही सांगितलं आहे,” असं शिंदे म्हणाले.
-
सध्या आमच्यावर टीका होत असली तरीही दिवसेंदिवस राज्यात ठिकठिकाणी दौरे करताना मिळत असलेला उदंड प्रतिसाद हेच या टीकेला उत्तर असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.
-
“हिंगोली जिल्ह्यातील अनेक विकासाचे प्रश्न कायम असून ते सोडवूनच आपण टीकाकारांना उत्तर देऊ”, असंही ते पुढे म्हणाले.
-
(सर्व फोटो : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे/ ट्विटर)
![12 February 2025 Horoscope In Marathi](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/12-February-2025-Horoscope.jpg?w=300&h=200&crop=1)
१२ फेब्रुवारी पंचांग: सौभाग्य योगात ‘या’ राशींना मिळेल कामाची योग्य पावती, तर कोणाची होईल इच्छापूर्ती; तुमच्या पदरी कसे पडणार सुख? वाचा आजचे राशिभविष्य