-
आज देशाचा ७६वा स्वातंत्र्यदिवस सगळीकडे मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्लीतील लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करत देशातील जनतेला स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.
-
अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनाची धामधुम संपूर्ण देशात पाहायला मिळत आहे. वेगवेगळ्या पद्धतीने नागरिक स्वातंत्र्यदिवस साजरा करताना दिसत आहेत.
-
देशाचे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी सीमेवर लढणाऱ्या जवानांनीही मोठ्या उत्साहात स्वातंत्र्यदिन साजरा केला.
-
सर्वाधिक उंचीवर असलेल्या युद्धभूमीवर सियाचीनच्या बर्फाळ प्रदेशात भारतीय सैन्याने ध्वजारोहण करत स्वातंत्र्यदिन साजरा केला.
-
यावेळी जवानांनी राष्ट्रगीत गायले.
-
सियाचीनच्या बर्फाच्छादित डोंगररांगात ध्वजारोहण करताना जवान.
-
तिरंग्याला मानवंदना देताना भारतीय जवान.
-
सियाचीनच्या ग्लेशियरमध्ये अभिमानाने तिरंगा फडकवताना भारतीय सैन्य.
-
लेहरा दो, लेहरा दो…
-
भारतीय कोस्ट गार्डने अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन अनोख्या पद्धतीने साजरा केला.
-
अंदमान आणि निकोबार बेटांवर भारतीय कोस्ट गार्डने पाण्याखाली तिरंगा फडकवला.
-
पाण्याखाली तिरंगा फडकवताना कोस्ट गार्डचे जवान.
-
लडाखमधील आयटीबीपी जवानांनी ७६वा स्वातंत्र्यदिन साजरा केला.
-
पॅंगॉंग तलावाजवळ ध्वजारोहण करताना आयटीबीपीचे जवान.
-
यावेळी जवानांनी परेड केली.
-
राष्ट्रगीत गाऊन तिरंग्याला मानवंदना दिली. (सर्व फोटो : ANI)

मोठी बातमी! पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढणार? केंद्र सरकारने एक्साइज ड्युटीमध्ये केली वाढ